रेणापूर शहराच्या स्वच्छतेत भर, 6 नवीन घंटागाडीचे लोकार्पण
रेणापूर ( प्रतिनिधी ) : रेणापूर नगर पंचायत हे मोठ्या लोकवस्तीचे ठिकाण असून येथील स्वच्छता करण्यासाठी अजून काही घंटागाडीची आवश्यकता भासत होती. शहरातील अंतर्गत नाले सफाई, कचरा व्यवस्थापन आणि शहराच्या स्वच्छतेची गरज ओळखून आणि संपूर्ण स्वच्छता नियमीतपणे आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून स्वच्छतेत भर म्हणून नागरी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत 36 लक्ष रुपयाचा निधी खर्च करून रेणापूरवासियांच्या सेवेसाठी अजून 6 घंटागाडी उपलब्ध करून दिल्या. या घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी नगर पंचायतचे बांधकाम सभापती दत्ता सरवदे, पाणी पुरवठा सभापती उज्वल कांबळे, नगरसेवक एकनाथ अकनगिरे, जमुनाबाई राठोड, रजियाबी शेख, श्रीकृष्ण मोटेगावकर, अंतराम चव्हाण, अजिम शेख, भाजपाचे तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, व्यापारी अध्यक्ष रमाकांत वाघमारे, राजकुमार आलापुरे, धनंजय म्हेत्रे, पाशाभाई शेख, हणमंत भालेराव, मारूफ आत्तार, महेश गाडे, गोविंद राजे, रेणुकादेवी मंदीर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम पाटील, सचिव उटगे गुरुजी, दिलीप अकनगिरे, लखन आवळे, योगेश राठोड, रमेश चव्हाण, दिलीप चव्हाण, टिंकु दळवी, रफिक शिकलकर, जयदीप बोडके, परमेश्वर मोटेगावकर, लक्ष्मण मारकड आदि पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.