नॅशनल कॅन्सर ग्रीड द्वारे लाईफ केअर येथील परिचारिकांना कॅन्सर प्रशिक्षण
उदगीर ( प्रतिनिधी ) : लाईफ केअर हॉस्पिटल येथील परिचारिकांना कर्किनोज हेल्थ केअरच्या माध्यमातून नॅशनल कॅन्सर ग्रीड द्वारे कॅन्सर रुग्ण तपासणी , काळजी बाबत प्रशिक्षण देण्यात आले . यावेळी प्रशिक्षणार्थींना बुधवार २५ रोजी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल कॅन्सर ग्रीड द्वारे लाईफ केअर येथील परिचारिकांना कॅन्सर एज्युकेशन अँड सर्व्हायकल कॅन्सर स्क्रिनिग बाबत प्रशिक्षण देण्यात आले .
गर्भाशय, मुखाच्या कॅन्सर तपासणी बाबत नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे या परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात आले .
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या परिचारिकांना या बाबत
नॅशनल कॅन्सर ग्रीड द्वारे प्रमाणपत्र देण्यात आले .
या प्रमाणपत्राचे वाटप डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी डॉ. पुजा पाटील, मिलिंद घनपाठी , कार्कीनोज हेल्थ केअर चे डॉ. अमोल गायकवाड , डॉ. निखिल गोरे
यांच्यासह शिवकुमार वट्टमवार , शिवाजी पाटील
उपस्थित होते .
लाईफ केअर येथील परिचारिकांना कॅन्सर बाबत आणखीन विविध प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे डॉ. अमोल गायकवाड यांनी यावेळी सांगितले .