नेत्रदान पुण्य महान – प्रा महेश बसपुरे

नेत्रदान पुण्य महान - प्रा महेश बसपुरे

                         

उदगीर ( प्रतिनीधी ) : समाजात नेत्रदाना बाबतीत जनजागृत्ती होणे अतिशय गरजेचे आहे.  कोनतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते , मरनोत्तर नेत्रदान करता येते.ज्यांना चष्मा आहे, ते सुध्दा नेत्रदान करू शकतात.ज्यांना ब्लडप्रेशर,डायबिटीस,दमा इ.विकार असतील ते सुध्दा नेत्रदान करू शकतात.असे प्रा.महेश बसपुरे यांनी सांगीतले.ते उदयगीरी लाॅयन्स नेत्ररूग्नालय उदगीर येथे राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा  25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कार्यक्रमात उपस्थीताना संबोधीत करते वेळी सांगितले

या प्रसंगी मंचावर उपस्थीत डाॅ.अर्चना पवार,डाॅ.सुप्रीया पाटील,डाॅ. स्वप्निल शिंदे,डाॅ.योगीता खुरे,अभिजीत औटे आदी माण्यवर उपस्थीत होते.उपस्थीत माण्यवरांचा सत्कार ही करण्यात आला.

  8 सप्टेंबर हा दिवस ‍राष्ट्रीय नेत्रदान दिवस म्हणून पाळतात.त्या आणुषांगणे नेत्रदानाचे वेळी घ्यावयाची काळजी, मृत व्यक्तीस ज्या खोलीत ठेवले आहे,तेथील पंखा बंद करावा.त्याचे डोळे बंद करून डोळयावर ओला कापूस अथवा ओला रूमाल ठेवावा व डोक्याखाली जाड उशी ठेवावी.आपल्या डॉक्टरकडून डेथ सर्टिफिकेट (मृत्यूचा दाखला) तयार ठेवावा.डोळयातील बुब्बळ मृत्यूनंतर सहा तासाचे आत काढावे लागतात.त्यामुळे जवळील नेत्रपेढीस त्वरित फोन करून कळवावे. नेत्रदानाचा फोन आल्याबरोबर नेत्रपेढीचे तज्ज्ञ डॉक्टर त्वरित जाऊन रुग्णाचे बुब्बुळे काढून नेतात.त्यावेळी नेत्रदात्याचे रक्तही तपासणीसाठी काढले जाते.एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. त्या मुळे नेत्रदानाचा संकल्प सोडा व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करा. असे ही आवाहन केले.यावैळी  तानाजी हजारे ,प्रशांत गायकवाड,गणेश जोगदंड,शंकर,जावेद शेख,सुरेश तिवारी,यांच्या सह हाॅस्पीटल येथील कर्मचारी सामायीक अंतर राखुन उपस्थीत होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशासकीय अधीकारी एस एस पाटील यांनी केले तर अभार प्रशांत गायकवाड यांनी मानले.

About The Author