श्यामार्य कन्या विद्यालयाची जाधव आदिती उमाकांत स्पर्धा परीक्षेत उदगीर तालुक्यात सर्वप्रथम
उदगीर ( प्रतिनिधी ) : श्यामार्य कन्या विद्यालयात स्पर्धा परीक्षेत उदगीर तालुक्यात सर्वप्रथम व लातूर जिल्ह्यात सहावी आलेल्या मुलीचा सत्कार समारंभ ठेवण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश मुंडकर , श्यामलाल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एम. उगिले आणि संयोजिका श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्ञाते तृप्ती या उपस्थित होत्या.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. या स्पर्धा परीक्षेत श्यामार्य कन्या विद्यालयाची मुलगी जाधव आदिती उमाकांत उदगीर तालुक्यात सर्व प्रथम तर जिल्ह्यात सहावी येण्याचा मान मिळवला आहे. शासनामार्फत या मुलीला दर वर्षी 12 हजार रुपये प्रमाणे इयत्ता बारावी पर्यंत एकूण 48 हजार रुपये मिळतात .
या यशाचे सर्व श्रेय माझे आई-वडील, मावशी आणि माझे सर्व शिक्षक बांधव यांना मी देते. असे मनोगतातून आदिती यांनी आपले मत व्यक्त केले. या मुलीला पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन श्यामलाल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गिरीश मुंडकर याच्या हस्ते सत्कर करण्यात आले.
या परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणी आर्य, उपाध्यक्ष गिरीश मुंडकर ,सचिव सकांये, सहसचिव अंजुमनीताई आर्य, श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्ञाते तृप्ती आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने अभिनंदन व गौरव करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हुरदळे आनंद तर आभार चोपडे नाना यांनी मांडले