कै.गोविंदराव पाटील माध्यमिक विद्यालय येळी येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा
लोहा (गोविंद काळे) : तालुक्यातील येळी येथील कै.गोविंदराव पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम श्री.हंबर्डे सर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता, हिंदू धर्मातील बहीण भावा हा पवित्र सण आहे राखीच्या बंधनांमुळे बहिणीचे संरक्षण करण्याची फार मोठी जबाबदारी भाऊ आनंदामध्ये स्वीकारतो असा हा बहिणीच्या रक्षणासाठी भावाला राखीच्या माध्यमातून बांधून ठेवणारा पवित्र उत्सव अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री.वर्तळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्षाबंधन आयोजित कार्यक्रमात उपस्तीत सर्व मान्यवरांना व विद्यालयातील शिक्षक बांधवाना श्रीम.केंद्रे मॅडम यांनी राख्या बांधल्या तसेच विद्यालयातील मुलींनी मुलांना राखी बांधून आपले पवित्र नाते जपण्याचे व बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर सोपविली. या कार्यक्रमात विध्यार्थ्यांनी स्वइच्छेने सहभाग घेऊन रक्षाबंधन हा पवित्र सण विद्यालयात साजरा केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.आडकिने सर यांनी केले तर आभार श्रीम.केंद्रे मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख बाबू व ढगे लोकडेश्वर व विध्यार्थ्यांनी कष्ट घेतले.