विहिंप बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे गोवंशाला जीवदान
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने अहमदपूर शहरामध्ये सोडण्यात आलेले मोकाट गौवंश गेल्या कित्येक महिन्यांपासून पायाचा ॲक्सिडेंट झाल्याने मोठी जखम त्याच्या पायाला झाली होती. ती जखम एवढी चिघळली होती की, तिचा खूप दुर्गंध येत होता व त्या बैलाला चालता ही येत नव्हते. सहाजिक आहे ते जर माणसाचे लेकरू असते तर नक्कीच कार्यवाही त्वरित झाली असती पण या मुक्या प्राण्याकडे पहायला कोणाला वेळ नाही. मात्र पशु अधिकारी डॉ पठाण व डॉ जाधव व त्यांच्या टीमने याचे नुकतेच ऑपरेशन केले. अहमदपूर शहराच्या राज्य महामार्ग व शहरात ही मोकाट जनावरे फिरतात, रस्त्यावर बसतात, यांचा अक्सिडेंट होतो, परंतु त्याच्याकडे अहमदपूर नगरपरिषद मा. मुख्याधिकारी यांना वेळोवेळी सूचना देऊनही कसलीही कार्यवाही होत नाही. दि. 22 /8/ 2021. रोजी बसस्थानकासमोर एक गाय मृत्यू पावली अशाच पद्धतीने तिच्या ही पायाला मोठी जखम होती. प्रशासन आता याकडे लक्ष देत नसेल तर विश्व हिंदू परिषदेला या प्राण्यांचे प्राण वाचवण्यासाठी कायदा हातात घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्ही प्रशासनाला ही शेवटची विनंती करत आहोत की रस्त्यावरील मोकाट जनावरांना त्वरित कोंडवड्यात टाकून त्यांची वैद्यकीय तपासण्या करून जे लोक सांभाळण्यास तयार आहेत त्यांच्या दावणीला पाठवावेत असे मधुकर धडे यांनी सांगीतले गोवंशावर वैद्यकीय शस्तक्रिया करताना सेवा देण्यासाठी सहकारी डॉक्टर आकरुपये , विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री मधुकर धडे, अर्जुन लिंबाळे, मंजीत बेंबडे, नरेश यादव, संतोष मोरे, अमोल सज्जनशेट्टी, अनिल घोडके, शरदभाऊ मेड, श्रीकांत केंद्रे, अविनाश चापकानाडे, शिवा कासले, सचिन कांडणगीरे आदी स्वयंसेवक उपस्थित होते..