चंदरआण्णा प्रतिष्ठानच्या वतीने दहा गरजू कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे वाटप
उदगीर (प्रतिनिधी) : येथील सामाजिक कार्यात सर्वात अग्रेसर असलेल्या चंदरआण्णा प्रतिष्ठान तर्फे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.श्रीकांत पाटील यांच्या वतीने सहकार महर्षी चंद्रकांत वैजापुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उदगीर व परिसरातील दहा गरजू कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपयाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांतआण्णा वैजापूरे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गोविंदआण्णा केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा.बस्वराज पाटील नागराळकर, उदगीरचे उपविभागीय अधिकारी मा.प्रवीण मेंगशेट्टी, उदगीरचे तहसीलदार मा.रामेश्वर गोरे, सौ. लक्ष्मीबाई वैजापुरे, सुप्रसिद्ध उद्योगपती श्रीमती विमलताई गर्जे, बामणीचे सरपंच मा.राजकुमार बिरादार, श्री रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेसचे संचालक प्रा.प्रदीप वीरकपाळे, विरशैव लिंगायत समाजाचे उपाध्यक्ष मा. प्रमोद शेटकार,विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, श्रीमती बालिका मुळे, मा.बालाजी पाटील नेत्रगावकर, मा.सय्यद शकील,रमेश खंडोमलके, सुहास गुजलवार,सादिक सय्यद,कल्याण बिरादार,प्रा.जामकर सर,पञकार अशोक कांबळे,सचिन वाघमारे,राजेंद्र सुगावे स्वामी,चेतन परसेण्णे,बावगे सर,महादेव महाजन, अविनाश खरात, श्री विठाई महिला भजनी मंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, त्यानंतर श्री विठाई महिला भाजणी मंडळातील सर्व महिला सदस्यांचा सत्कार करण्यात आला व शेवटी दहा गरजू व होतकरू कुटुंबांना प्रत्येकी 50हजार रुपयांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक पी.टी.एचे तालुका अध्यक्ष प्रा.सिद्धेश्वर पटणे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक तथा चंदरआण्णा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.श्रीकांत पाटील यांनी केले.