मागील आठवड्यातील भीज पावसाने टोमॅटो उत्पादक शेतक-यांना फटका, दरात मोठी घसरण

मागील आठवड्यातील भीज पावसाने टोमॅटो उत्पादक शेतक-यांना फटका, दरात मोठी घसरण

तालुक्यात आवक वाढल्याने खराब माल रस्त्यावर तर उच्च प्रतीचा माल राजस्थान, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमधे विक्रीसाठी रवाना

अहमदपूर (गोविंद काळे) : टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसत असून कांही ठिकाणी वावरातील माल काढून रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे.

  तालुक्यात देवकरा, विळेगाव, परचंडा, लांजी, तांबटसांगवी, मावलगाव या गावात टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत.सध्या बाजारात टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.मागील आठवड्यात झालेल्या भिज पावसाने झाडाला लगडलेली तसेच खाली तुटून पडलेले टोमॅटो  खराब झाले आहेत.अशा टोमॅटोस व्यापारी घेऊन जाण्यास तयार नसून व्यापारी फक्त उच्च प्रतिच्या मालाची मागणी करीत आहेत.तालुक्यातील बाजारपेठेत टोमॅटो आवक वाढल्याने व मालाचा दर्जा नसल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.उच्च प्रतिच्या मालास चार ते पाच रूपये किलो दर मिळत असून हा माल व्यापारी उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू या ठिकाणी घेऊन जात आहेत तर हलक्या प्रतिचा माल काढणे व बाजारात आणण्यासाठी लागणारा खर्चही निघत नसल्याने शेतक-यांना माल रस्त्यावर टाकून द्यावा लागत आहे.
जुन सुरूवातीला 440 वाणाचे दोन एकर मधे टोमॅटो लागवड करण्यात आली आहे, सध्या टोमॅटोला 4 ते पाच रूपये किलो भाव मिळत आहे.अपेक्षित दरापेक्षा पंचाहत्तर टक्के तुट येत आहे. नरसींग शेरे, परचंडा. 
पावसाने खराब झालेल्या मालास खरेदी दार मिळत नसल्याने असा माल शेतक-यांनी बाजारात आणला तरी विकत नाही.व्यापा-यांना माल तोडणे व वहातूक करणे परवडत नसल्याने शेतकरी माल रस्त्यावर टाकत आहेत. अजहर बागवान, भाजीपाला ठोक विक्रेते.

About The Author