इंधन संरक्षण जागरूकता निर्माण करणे हे एक सामाजिक व राष्ट्र हिताचे कार्य – केदार खमितकर

इंधन संरक्षण जागरूकता निर्माण करणे हे एक सामाजिक व राष्ट्र हिताचे कार्य - केदार खमितकर

अहमदपूर (गोविंद काळे) :गृह ऊर्जा दक्षता कार्यक्रम अहमदपूर येथील श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ,मांडूरकी द्वारा संचालित संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूर आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय,भारत सरकारच्या पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघ (PCRA) यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता.कार्यक्रमात मुख्य अथिति संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे-हाके मॅडम, व्ही.पी.श्रृंगारे,एक.पी.रोडगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्दीष्ट महिलांना इंधन संवर्धनाचे महत्त्व,पद्धती आणि फायदे याबद्दल जागरूक करणे आहे. ऊर्जा पर्यावरण आणि निसर्गनियमांचे पालन या विषयांवरती पीसीआरए चे व्याख्याता केदार खमितकर यांनी मार्गदर्शन केले. इंधन दरवाढ गेले काही वर्षात सततचीच बाब झाली आहे. वीजेच्या वापरावरही भरमसाट खर्च वाढत आहे.अशा परिस्थीतीत पर्यायी इंधनाचा वापर आणि इंधन बचत अटळ आहे. इंधन संरक्षण जागरूकता निर्माण करणे हे एक सामाजिक आणि राष्ट्र हिताचे कार्य असल्याचे खमितकर म्हणाले. पर्यायी इंधनाचा ,इंधनाच्या सुयोग्य वापराचे, इंधन बचतीचे मार्ग कोणकोणते आहेत यावर अभिनव उपाय व मार्गदर्शन केले. माणसाच्या गरजा वाढल्यामुळे त्यांच्या विकासाच्या सर्व संधी नाहीश्या करून टाकत नाहीत ना, याविषयी माणूस फारसा विचार करताना दिसत नाही. आजची गरज भागली म्हणजे झाले, उद्याचे कोण बघितले आहे ? अशी कृत्ती झाली आहे व ती पर्यावरणास घातक आहे. वेगवेगळे निसर्गमित्र व संस्था पृथ्वीच्या या दुर्दशेबद्दल जगभरात लोकांना अवगत व शिक्षित करण्याचा आप-आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण आता पृथ्वीसमोरील भविष्यातील धोकेच एवढे वाढले आहेत की,जगभरातील सर्व निसर्गमित्र व संस्था एकत्र केल्या तरी देखील सर्व लोकसंख्येला शिक्षित करायला कमी पडतील असे मत केदार खमितकर यांनी मांडले. ‘अंधाराकडून प्रकाशाकडे’ या संकल्पनेचे सक्षम-२१ चा शुभारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्रीमती एम.आर. तोवर यांनी विशेष परिश्रम घेतले. अहमदपूर येथील महिला प्रतिनिधी, शिक्षिका, विद्यार्थींनी व इतर संस्थेचे कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले होते. पीसीआरए जनजागृती माहितीपट यावेळी दाखविण्यात आले. समारोप इंधन सक्षम प्रतिज्ञाने करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना तोवर यांनी केले.कार्यक्रमाचेसुत्रसंचलन संगीता आबंदे यांनी केले. संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे-हाके, मुख्याध्यापक आशा रोडगे,मुख्याध्यापक उध्दव श्रृंगारे सर सह महिला पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author