बलात्कार करणाऱ्या नगरसेवक पतीवर पुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल

बलात्कार करणाऱ्या नगरसेवक पतीवर पुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल

उदगीर ( प्रतिनिधी ) : शहरातील एका नगरसेविकेच्या पतीने बलात्काराचा गुन्हा दाखल असतानाही त्याच महिलेचा पुन्हा विनयभंग केला असून ‘मी जगू देणार नाही’ अशी धमकी दिल्याने शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.२७) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील नोबल कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेला एक जून पासून ते २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत सतत पाठलाग करून वाईट नजरेने बघणे व फिर्यादी महिलेचे समोर अश्लील भाषेत शेरेबाजी करणे, अश्लील हावभाव करीत त्रास देत होता. फिर्यादीची आई समजावून सांगण्यास गेली असता तिला ‘ती कशी जगते मी बघतो’ अशी धमकी दिली. वगैरे मजकूर फिर्यादीने शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत दिल्याने आरोपी नगरसेवक पती मिर्झा अक्रम बेग (रा.समतानगर) डॅम रोड उदगीर याच्याविरुद्ध शुक्रवारी (ता.२७) रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे एक वर्षापूर्वी बलत्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा याच महिलेच्या फिर्यादीवरून या आरोपी वर दाखल झाला होता. या आरोपीस काही महिने अटकही झाली होती. तो जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा याच महिलेला त्रास देण्याच्या उद्देशाने या आरोपीने पाठलाग करून अश्लील शेरेबाजी व हावभाव करणे सुरु केले होते. अशी माहिती तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक श्री आंदोरीकर यांनी दिली आहे.

शुक्रवारी या आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे. येथील न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले असता न्यायालयाने या आरोपीस जामीन दिला असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी दिली आहे.

–चौकट……

माहिती लपवण्याचा पोलीस पॅटर्न

सध्या उदगीर शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल होत असलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवण्याचा एक उदगीर पॅटर्न निर्माण करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या निर्देशानुसार सोशल मीडिया ग्रुप तयार करण्यात आला असला तरी या ग्रुपवर अशा गंभीर गुन्ह्यांची माहिती लपवण्याचे काम गेल्या कित्येक दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे गुन्हे लपवण्या मागे पोलिसांचा इंटरेस्ट काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!