गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – नितीन लोहकरे
उदगीर (एल.पी. उगिले) : सद्यस्थितीत कोरोनाविषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया चालू आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी हा एक निवडलेला पर्याय आहे. मात्र शिक्षण गुणवत्ता पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. असे आवाहन नूतन गटशिक्षणाधिकारी नितीन लोहकरे यांनी केले. नगरसेवक मनोज कपाळे यांच्या अध्यक्षतेखाली शशिकांत बनसोडे मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नितीन लोहकरे बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून करडखेलचे माजी सरपंच दयानंद कसबे, उपसरपंच मुळे नामदेव, काँग्रेसचे अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष कसबे पांडुरंग, कसबे वेंकट, शिंदे ज्ञानेश्वर, कसबे मनोहर, तांबोळी रसूल साब, स्वामी राम, कसबे किशोर, कसबे लखन, कसबे माधव, कसबे पिराची, कसबे नितीन, कसबे पांडू तात्या, कसबे माधव कसबे महादेव कसबे अजय कसबे महेश, कसबे दामोदर, कसबे सावंत, कसबे गोविंद, बालाजी कसबे, अभिजीत कसबे, पांडुरंग कसबे, राजकुमार कसबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत बनसोडे यांनी केले.
पुढे बोलताना नितीन लोकरे म्हणाले की, समाज परिवर्तनासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण काळाची गरज आहे. शिक्षणाला प्राधान्य देऊन शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. विद्यार्थ्यांची गळती थांबावी आणि सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात येता यावे, यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करावेत. असेही आवाहन त्यांनी केले. आभार प्रदर्शन दारा कांबळे यांनी केले.