श्यामलाल हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

श्यामलाल हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
श्यामलाल हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

उदगीर ( प्रतिनिधी ) : येथील श्यामलाल हायस्कूलमध्ये हॉकी या खेळाचे खेळाडू  मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन देशभरामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने शारीरिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी  प्रत्येक विद्यार्थी व नागरिक यांनी आपल्या जीवनामध्ये मैदानी खेळाला महत्त्व दिले पाहिजे. विविध खेळ खेळल्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. हार-जीत पचवण्याची ताकद व्यक्तीमध्ये येते. चांगले आरोग्य हीच संपत्ती आहे हे आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी दिवसभरातून किमान एक तास तरी खेळ खेळला पाहिजे असे मनोगत माननीय आनंद चोबळे यांनी व्यक्त केले. सध्या कोरोणा ची पार्श्वभूमी पाहता सर्व विद्यार्थ्यांनी सुरक्षित अंतर राखून व सर्व उपाय योजना सह खेळ खेळले पाहिजेत असे मत व्यक्त केले. व उपस्थित सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाप्रसंगी शेख सईद, उमाकांत सूर्यवंशी, बसवराज स्वामी इत्यादी उपस्थित होते.

About The Author