महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची आढावा बैठक..!
अहमदपूर (गोविंद काळे) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री ना.संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीलादि. महाराष्ट्र राज्य फेडरेशन पणन महासंघाचे चेअरमन तथा आमदार बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती आमदार यांनी या बैठकीत काही महत्वाचे विषय यनिमित्ताने हाताळण्यात आले. अहमदपूर – चाकूर मतदारसंघातील जास्तीत जास्त गोठे बांधणीच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात यावी. तसेच रेशीम उद्योग्यांना चालना मिळाली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.
तसेच मंजूर आणि प्रस्तावित असलेल्या वैयक्तिक विहीरींचा आढावा घेतला. नरेगा अंतर्गत अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात सुरु असलेल्या कामांना गती देणे, तसेच फळबाग लागवडीला चालना देणे आणि निगडित विषय निगडित विषय लवकरात लवकर कसे सोडवता येतील यावर सुद्धा चर्चा झाली. यावेळी राज्यमंत्री संजयजी बनसोडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.