प्रतिकुल परिस्थितीत खचून न जाता यश मिळविण्यासाठी कायम प्रयत्नशील रहावे – जि.प.माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : सामाजिक व राजकीय जीवनामध्ये काम करीत असताना काही वेळा यश मिळते तर काही वेळा काम करूनही पराभवाला सामोर जावे लागते. परंतु अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये खचून न जाता आपण सक्षपमणे वाटचाल करावी. आणि यश मिळविण्यासाठी कायम प्रयत्नशील रहावे. असे प्रतिपादन जि.प.माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर केले.
यावेळी त्या भाजपा युवा मोर्चा लातूर शहर यांच्यावतीने स्वामी विवेकांनद इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक येथील सभागृहात भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाला जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, समन्वयक विनोद जाधव, समन्वयक संभाजीराव पाटील, मनपा स्थायी समिती सभापती दिपक मठपती, भाजपा युवा मोर्च्याचे सरचिटणीस गणेश गोजमगुंडे, अमोल गित्ते, व्यंकटशे हंगरगे, प्राचार्य डॉ.आर.एस.अवस्थी, कमलाकर कदम, प्राचार्य शैलेश कचरे, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मोहन खुरदळे,प्राचार्य राजकुमा साखरे, प्राचार्य मनोज गायकवाड,प्राचार्य सच्चिदानंद जोशी, प्राचार्य शिंदे पांचाळ, मुख्याध्यापक संजय बिराजदार, प्राचार्य आशा जोशी, इस्टेट मॅनेजर चंद्रशेखर पाटील चाकुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अॅड.गणेश गोजमगुंडे म्हणाले की, भारतीय जनता युवा मोर्च्याच्या माध्यमातून काम करीत असताना अजितसिंह पाटील कव्हेकर ऊर्फ भैय्या अत्यंत कमी कालावधीमध्ये खुप मोठे संघटन वाढले. त्यांच्या राजकीय वाटचालीमुळे भाजपा पक्षवाढीत मोठे योगदान मिळालेले आहे. अजित भैय्यांच्या प्रयत्नामुळे सर्वात मोठे तरूणांचे संघटन भाजपा युवा मोर्च्याच्या माध्यमातून झालेले आहे. त्यामुळे यापुढील कालावधीतही ही त्यांची राजकीय वाटचाल अशीच यशस्वी होत राहो, अशी अपेक्षाही भाजपा युवा मोर्च्याचे सरचिटणीस गणेश गोजमगुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
प्रारंभी भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या या शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून 101 जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वामी विवेकांनद ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य गोविंद शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अब्दुलगालिब शेख यांनी केले तर आभार संजय बिराजदार यांनी मानले. या रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी महात्मा बसवेश्वर मंडल प्रमुख संजय गिर, भाजपा युमोचे सरचिटणीस सागर घोडके,गजेंद्र बोकन, शंभूराजे पवार, गणेश गवारे,विशाल सोनवणे, सुनिल राठी, राहुत भूतडा, वैभव डोंगरे, गोविंद सुर्यवंशी, धनंजय आवस्कर, अजय कोटलवार, ओम धरणे, राजेश पवार, ऋषी जाधव, चैतन्य फिस्के, ऋषिकेश क्षिरसागर, आकाश जाधव, यशवंत कदम,राम बेडजवळगे, मंदार कुलकर्णी, महादेव पिटले यांच्यासह भाजयुमोच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
जमीनीशी नाळ कायम ठेवून काम करणार – अजितसिंह पाटील कव्हेकर
भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची राजकीय वाटचाल जवळून पाहत आलेलो आहे. त्यामुळे माझ्या राजकीय जीवनामध्ये कितीही मोठी पदे आली तरी हुरळून न जाता. साहेबांचा आदर्श समोर ठेवून अन् जमीनीशी नाळ कायम ठेवून भविष्यातील राजकीय वाटचाल सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा नेते तथा नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.