लाईफ लाईन लाईफ केअर रुग्णालयाचा कचरा टाकला जातोय रस्त्यावर
रुग्णांना उपचारासाठी वापरलेल्या औषधी व इंजेक्शनचा कचरा रस्त्यावर टाकुन संसर्गजन्य रोग पसरविण्याचे करतात काम.
औराद शहाजानी (भगवान जाधव) : येथील महाराष्ट्र विद्यालय शाळेच्या समोर असलेले बालरोगतज्ञ यांचे लाईफ लाईन लाईफ केअर बाल रुग्णालयाचा वापरलेल्या औषधोपचारांचा कचरा शाळेच्या बाजूच्या खुल्या रस्त्यावर टाकुन आजारांना निमंत्रण देत असल्याचे चित्र दिसत आहे. गावात अगोदरच डेंग्यु सारख्या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण सध्या भरपुर प्रमाणात वाढत आहेत आणी अश्यातच एक सुज्ञ बालरोगतज्ञ असलेल्या रुग्णालयाचा उपचारादरम्यान वापरलेली औषधांचा कचरा शाळेशेजारच्या रस्त्यावर टाकुन उचार करुन रुग्ण बरे करणारे डॉ. अश्या संसर्गजन्य आजाराला निमंत्रण देत असल्याचे पहावयास मिळत असल्याने प्रशासन अश्या या हलगर्जीपणा करणाऱ्या अरोग्यविषयी परीस्थीवर काय कार्यवाही करेल अशी चर्चा औराद वासीयांमधुन रंगत असल्याचे पहावयास मिळत आहे.