कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेचे निकाल जाहीर

कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेचे निकाल जाहीर

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे नाविन्यपूर्ण उपक्रम

अहमदपूर (गोविंद काळे) : सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य आँनलाईन राज्यस्तरीय फँन्सी ड्रेस (वेशभूषा) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे निकाल उत्तर प्रदेशातील राज्यपुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षिका यतिका पुडिर यांच्या हस्ते 2 सप्टेंबर रोजी यूटूब लिंक द्वारे आँनलाईन निकाल घोषित करण्यात आला. सन 2021-22 मध्ये वर्षभर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सृजन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबविणार आहेत अशी माहिती सचिव महादेव खळुरे यांनी यावेळी माहिती दिली.भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “कृष्ण जन्माष्टमी “निमित्ताने वेशभूषा स्पर्धेचे दोन गटातून स्पर्धेचे आयोजन केले होते.

यामध्ये वय वर्ष 1 ते 7 वर्ष व 8 ते 12 वर्ष असे दोन्हीही गटाचा खालील प्रमाणे निकाल घोषित करण्यात आला. लहान गटात सर्व प्रथम-आर्यंश देशमुख, द्वितीय- दीक्षा मठपती, तृतीय – जोशी तर उत्तेजनार्थ चैतन्य सूर्यवंशी, सानवी धात्रक, विराज विरकर, अग्रिमा कांत, शौर्य वाघमारे, वेदांत काष्टे, विराजस वेलदे यांची निवड झालेली आहे.तर वय वर्ष 8 ते 12 वर्षाच्या गटातून सर्व प्रथम-तन्मय घाटी,द्वितीय -दिशा सोळंकी, तृतीय- अनुष्का डहाळे तर उत्तेजनार्थ कृष्णाई शेळके, पूजा शाहू या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

आँनलाईन राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत महाराष्ट्रासह इतर राज्यातून 135 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.स्पर्धेचे निकाल यूटूब चँनेलच्या माध्यमातून आँनलाईन घोषित करण्यात आला. स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना फोन पे द्वारे रोख रक्कम व गुणवंत विद्यार्थ्यांना व सहभागी विद्यार्थ्यांना आँनलाईन ई-सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आले. वरील स्पर्धेसाठी उत्तर प्रदेशातील राज्य पुरस्कर प्राप्त शिक्षिका यतिका पुडिर,किरण खमितकर,महादेव खळुरे,मल्लपा खळुरे, पद्मा कळसकर, वर्षाराणी कंगळे, परमेश्वर खळुरे आदिनी परिश्रम घेतले.

About The Author