हस्तशिल्प सेवा केंद्र कार्यालयविकास आयुक्त (हस्त शिल्प) औरंगाबादच्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : हस्तशिल्प सेवा केंद्र कार्यालय विकास आयुक्त (हस्त शिल्प) औरंगाबाद च्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळा प्रसाद गार्ङन येथे पार पडली. या कार्यशाळेत एकूण चाळीस महीला सहभागी झाल्या होत्या. हॅन्ङ एम्राॅयङरी, जर धोजी, जूट बॅग, जूट पर्स अशा विवीध वस्तू बनवणे त्याच बरोबर त्याच मार्केटिंग करणे या विषयावर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मंचावर हस्तशिल्प सेवा केंद्राचे वरीष्ठ सहा निदेशक संतोषकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक अभय मिरकले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार सुरेश ङबीर काका कलापुष्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रशेखर भालेराव नगर परिषदेचे साहेबराव शेवाळे यांची उपस्थिती होती कार्यशाळेत प्रा ङाॅ श्रीरंग होळकर प्रा ङाॅ विष्णूकांत शेळके प्रा ङाॅ मनिषा बोङके यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ङाॅ मनिषा बोङके यांनी केले तर आभार रमाकांत कांबळे यांनी मानले.