श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेच्या नूतन पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा संपन्न
उदगीर : येथील श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेच्या सर्व अस्थापना मार्फत उत्साहात संपन्न झाला.
श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे नूतन संस्था अध्यक्ष ऍड. सुपोषपाणिजी आर्य सर, उपाध्यक्ष माननीय गिरीश जी मुंडकर सर, सचिव माननीय ऍड. विक्रमजी संकाये सर,
सहसचिव अंजुमनीताई आर्य तसेच विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले संस्था हितेशी माननीय सुबोधजी आंबेसंगे सर, माननीय पंडितजी सुकनीकर, माननीय ज्येष्ठ पत्रकार श्री एल. पी. उगिले सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चे मुख्याध्यापक माननीय आनंद चोबळे सर, श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती तृप्ती ज्ञाते, श्यामलाल प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक विवेकानंद उगीले सर, श्यामलाल सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल श्री शिरसे सर, श्यामलाल कॅश क्रेडिट सोसायटीचे श्री गोखले सर,श्री सपाटे सर, शिवाजी विद्यालय रोहिणी चे प्रभारी मुख्याध्यापक श्री शिंदे सर इत्यादींनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने यथोचित सत्कार केला तसेच सर्व अ स्थापना प्रमुख व शिक्षकांनी आपल्या शाळेत होत असणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची माहिती संस्था पदाधिकारी यांना दिली. सत्कार सोहळ्यानंतर मार्गदर्शन सभेमध्ये माननीय संस्था सचिव ऍड.विक्रमजी संकाये सर यांनी शैक्षणिक प्रक्रियेत covid-19 ची पार्श्वभूमी पाहता जी आव्हाने आहेत ती आव्हाने सक्षमपणे पेलावीत व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कशा पद्धतीने देता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे यासंबंधी मार्गदर्शन केले. माननीय संस्था सहसचिव
अंजुमनीताई आर्य यांनी विचलित न होता सर्व शिक्षक शिक्षिका यांनी विद्यादानाचे पवित्र कार्य आत्मविश्वासाने व जिद्दीने पूर्ण करावे यासंबंधी मार्गदर्शन केले.
माननीय संस्था अध्यक्ष ऍड. सुपोषपाणिजी आर्य सर यांनी विद्यादानाच्या पवित्र यज्ञामध्ये सर्वांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना हेरून विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कला, क्रीडा,विज्ञान यासारख्या अनेक विषयांमध्ये पारंगत विद्यार्थ्यांना संधी देण्याचे व त्यांच्या कौशल्याचा अधिक विकास करण्याचे कार्य ही संस्था नेहमीच करेल. Covid19 पार्श्वभूमी पाहता गरीब, होतकरू विद्यार्थ्यां पर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे याची व्यवस्था संस्था पातळीवरूनही केले जाईल यासंबंधी आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण भोळे यांनी केले तर आभार श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तृप्ती ज्ञाते मॅडम यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.