श्री. रवींद्रनाथ टागोर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात कोविड लसीकरण संपन्न

श्री. रवींद्रनाथ टागोर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात कोविड लसीकरण संपन्न

लातुर : जिल्ह्यातील पाखरसांगवी श्री. रवींद्रनाथ टागोर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दि. ०४ सप्टेंबर २०२१ रोजी कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी कोरोना लसीकरण आयोजित करण्यात आले होते.

आयोजित लसीकरण कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्ष मा. श्री. भगवानराव पाटील व श्रीमती वैशालीताई पाटील तसेच मुख्याध्यापिका मेघा पाटील तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच लसीकरणासाठी आरोग्य विभागातील डॉ. वाघमोडे मॅडम व आरोग्य विभागाची सर्व टीम तसेच आशा वर्कर्स यांनी ही खुप सहकार्य केले.

आयोजित केलेल्या लसीकरण कार्यक्रमात एकुण १८० नागरिकांना लस देण्यात आली. यावेळी शाळेच्या वतीने आरोग्य कर्मचारी तसेच आशा वर्कर्स यांच्या संस्थेच्या वतिने वैशालीताई पाटील व मुख्याध्यापिका मेघा पाटील यांनी सत्कार केला यावेळी सुत्र संचालन व आभार संतोष मलवाड सर यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!