ऑनलाईन कार्यशाळेतून पर्यावरणपुरक गणेशमुर्ती निर्मितीचे धडे

ऑनलाईन कार्यशाळेतून पर्यावरणपुरक गणेशमुर्ती निर्मितीचे धडे

स्वामी विवेकानंद विद्यालयाचा पुढाकार : ऑनलाईन कार्यशाळेत 450 विद्यार्थ्यी सहभागी

लातूर (प्रतिनिधी) : जेएसपीएम द्वारा संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय,कळंब रोड या शाळेच्यावतीने 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांच्या पर्यावरणपूरक गणेश मुर्ती बनविण्याची ऑनलाईन कार्यशाळा कला शिक्षक पांडूरंग देशमुख यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या कार्यशाळेला 450 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रतिसाद दिल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पर्यावरणपुरक गणेश मुर्ती बनविण्याचे धडे मिळाले. अन् त्या ऑनलाईन प्रशिक्षणातून सुंदर आणि सुबक गणेश मुर्ती विद्यार्थ्यांनी बनविल्या. त्यांच्या या कलाकृतीतून मिळालेला आनंद इतर विद्यार्थ्यांसाठी पे्रेरणादायी ठरणारा आहे.
जेएसपीएमद्वारा संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयाच्यावतीने 1 ली ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कार्यशाळा घेवून पर्यावरणपुरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलेे होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत 450 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कार्यशाळेत सहभाग घेवून पर्यावरणपुरक गणेश मुर्ती बनविण्याचा आनंद घेतला. या कार्यशाळेसाठी जेएसपीएम संस्थेचे समन्वयक विनोद जाधव, स्वामी विवेेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य गोविंद शिंदे, उपप्राचार्य सुनिल मुचवाड, उपप्राचार्य संजय अंकुश, मुख्याध्यापक संजय बिराजदार, उपमुख्याध्यापक प्रभाकर सावंत, व्यंकट कांबळे, ए.बी.अंकुशे, पाटील, वाडीकर, वेदे, लकशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर घेण्यात आलेल्या पहिल्याच ऑनलाईन कार्यशाळेला 450 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेतून पर्यावरणपुरक गणेश मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे या कलाकृतीचा प्रचार व प्रसार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचा आदर्श इतर विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे.

About The Author