सृजन संस्थेमार्फत इको-फ्रेडली गणेश मूर्ती स्पर्धेचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने इको-फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करणे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पर्यावरण संरक्षणासाठी व रक्षणासाठी प्लास्टरच्या मूर्तीचा वापर न करता परिसरात उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्ती शाडू माती किंवा इतर साहित्यापासून मूर्ती तयर करावे. मूर्ती तयार करताना मध्ये विविध झाडांच्या बियांचा वापर करावे.या स्पर्धेसाठी दोन गट ठेवण्यात आले आहेत.पहिला गट वय वर्ष १ ली ते ५ वी व दुसरा गट ६ वी ते १० वी असे दोन गटात ही स्पर्धा आयोजित केली आहे.या स्पर्धेत दोन्हीही गटात प्रथम,द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना ई- सर्टिफिकेट देण्यात येईल असे संस्थेचे सचिव महादेव खळुरे यांनी सांगितले आहे. सदरील स्पर्धेचे मूर्ती तयार करतांनाचा एक फोटो व शेवटी मूर्ती तयार झाल्यावर गणेश मूर्ती हातात धरुनचा एक फोटो ८७९६६६५५५५ या वाटस अँप नंबर वर दि.१० सप्टेंबर रोजी पाठवून देण्यात यावे असे अवाहान करण्यात आले आहे. स्पर्धेचे निकाल १५ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.