एका दरोडेखोरस २४ तासात पोलीस निरीक्षक सुडके यांनी केले जेरबंद

एका दरोडेखोरस २४ तासात पोलीस निरीक्षक सुडके यांनी केले जेरबंद

शिरूर अनंतपाळ ( किशोर सुरशेट्टे ) : तालुक्यातील हालकी ते बोरी रस्त्यावरील तळेगाव (बो) येथे दरोडा टाकून पळ काढलेल्या एका दरोडेखोरास पोलीस निरीक्षक अंगद सुडके सह कर्मचाऱ्यांनी अवघ्या २४ तासात जेरबंद करण्यात यश आले आहे .हालकी ते बोरी रस्त्यावरील तळेगाव (बो) येथे तीन अज्ञात दरोडा खोरानी जना फायनान्सचे एक कर्मचारी परिसरातील खेड्यातून पिग्मी गोळा करून तळेगाव मार्गे मोटारसायकल वरून लातूर जात असताना अज्ञात तीघांकडून गाडी अडवून जमा झालेली पिग्मी एक लाख २६ हजार ५३० रुपये व सॅमसंग कपनीचा दहा हजाराचा मोबाईल अणि पिग्मी साठी लागलेली मशीन असा
एक लाख ३८ हजार रुपये अज्ञाताकडून जना फायनान्स खाजा मैनोदीन जिंदा मुजेवार या कर्मचाऱ्याची लुटमारी करून आरोपी पसार झाले . या फरार झालेले आरोपीना पोलीस निरिक्षकांसह कर्मचारी आरोपीताच्या माग काढत अवघ्या २४ तासाच्या आत एकास जेरबंद करण्यात यश आले आहे .

About The Author

You may have missed

error: Content is protected !!