बाळासाहेब पाटोदे यांच्यावतीने उदागीर बाबा देवस्थानला 51 हजाराची देणगी

बाळासाहेब पाटोदे यांच्यावतीने उदागीर बाबा देवस्थानला 51 हजाराची देणगी

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील भारतीय जनता पार्टीचे युवानेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी उदागीर बाबा देवस्थानच्या विकास कार्यासाठी 51 हजाराची आर्थिक मदत केली आहे. बाळासाहेब पाटोदे यांनी यापूर्वीही सामाजिक कार्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या दातृत्वाबद्यल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.शहरातील दानशुर भक्तांनी देवस्थानच्या विकासासाठी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थानच्या ट्रस्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

error: Content is protected !!