सुसंस्कृत राष्ट्रांचे स्वप्न पाहणारे शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन – प्रा शिवाजीराव देवनाळे

सुसंस्कृत राष्ट्रांचे स्वप्न पाहणारे शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन - प्रा शिवाजीराव देवनाळे

उदगीर : सुसंस्कृत राष्ट्रांची निर्मिती सुसंस्कृत शिक्षक करू शकतो. ज्या देशामध्ये शिक्षकाला मान आणि प्रतिष्ठा असते तिथे प्रज्ञेचे राज्य असते. पुस्तकं केवळ परीक्षा देन्याच साधन नाही तर अनेक संस्कृतीला जोडणारा तो महापुल आहे. समाजाला सुसुसंस्कृत करणारा शिक्षक देशाचा आधार असतो.म्हणून नागरीकाने या पवित्र व्यवसायांचा सन्मान केला पाहिजे म्हणणारे सर्वपल्ली राधाकृष्णन सुसंस्कृत राष्ट्रांचे स्वप्न पाहणारे खरे शिक्षक आहेत असे गौरव उद्गार प्रा शिवाजीराव देवनाळे यांनी शिक्षक दिनी काढले.
मौजे गुडसूर येथे पदमावति मा विद्यालय येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एन बी गोमरे होते. पुढे बोलताना प्रा देवनाळे म्हणाले १९५४ ला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारत रत्नाने सन्मानित केले. तो तमाम भारतीय शिक्षक वर्गाचा सामान होता. पुढील समश्येसाठी तत्पर पिढी निर्माण करणे,नितिमान,
विज्ञान निष्ठ नवा माणुस निर्माण करणे हे जोखिमिचे कामं फक्त शिक्षक करू शकतो अशा शिक्षकाचे गुरु सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत.हा महान विचाराचा ठेवा आहे. हा ठेवा ज्या राष्ट्रांला लाभला त्या देशाचे आम्ही नागरिक आहोत याची ओळख असावी
अशेहि ते म्हणाले.
या कार्य क्रमास प्रा सोनटक्के, आर बी काकडे, कृष्णराज भोसले,सौ एस आर शिंदे, सौ एस पी पाटील, सौ एस टी मोरे, तुकाराम महाराज,बालाजी पाटील, मारोती फड या कर्म चा ऱ्या सह विद्यार्थि उपस्थित होते.

About The Author