आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज – प्राचार्य डॉ आर. एम. मांजरे
उदगीर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम.मांजरे तर मराठी विभागप्रमुख डॉ. सुरेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाहू महाराजांच्या विचारकार्यावर प्रकाश टाकताना डॉ.मांजरे म्हणाले, कोल्हापूर संस्थानचे दृष्टे राजे आणि थोर समाजसुधारक यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आणि आरक्षणासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. आरक्षणाचे जनक, शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणारे शिक्षण तज्ज्ञ, जाती निर्मूलन, स्त्री उद्धारक, शेती आणि उद्योगांच्या क्षेत्रात कार्य करणारे नेशन बिल्डर म्हणून त्यांना ओळखले जाते. अशा प्रकारच्या लोककल्याणकारी कार्यामुळे कानपूर येथील कुर्मी क्षत्रिय सभेने १९१९ मध्ये ‘राजर्षी’ ही पदवी बहाल केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेश शिंदे यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहसंयोजक डॉ. ज्ञानोबा मुळे यांनी मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम जयंती समितीच्या वतीने घेण्यात आला.
