बालाघाट पॉलिटेक्निक मध्ये शिक्षक दिन साजरा

बालाघाट पॉलिटेक्निक मध्ये शिक्षक दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट पॉलिटेक्निक रुद्धा येथे शिक्षक दिनानिमित्त संस्थेचे संचालक मा कुलदीप हाके यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो वास्तव 5 सप्टेंबर हा दिवस महान विद्वान आणि शिक्षक असलेल्या डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. देशभरातील विद्यार्थी आपल्या शिक्षकांचा आदर करण्यासाठी हा दिवस पाळतात. असे म्हटले जाते की शिक्षकाचे आपल्या समाजातील कणासारखे असतात विद्यार्थ्यांची पात्रता वाढविण्यात आणि त्यांना भारताचे एक आदर्श नागरिक होण्यासाठी आकार देण्यासाठी त्यांची मोठी भूमिका असते.असे मत कुलदीप हाके यांनी मांडले. यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांना कुलदीप हाके यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक कुलदीप हाके, शिवलीकाताई हाके, प्राचार्य डॉ. नितीन शिवपूजे, आरती पुणे, सिद्धू मासोळे, संग्राम सुरणर,दुधाटे भरत, विद्या शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!