जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे रुद्धा येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे रुद्धा येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला

अहमदपूर (गोविंद काळे) : भारताचे प्रथम उपराष्ट्रपती आणि द्वितीय राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक, दार्शनिक आणि विचारवंत होते. त्यांच्या विद्वत्तेमुळे सन 1954 मध्ये त्यांना भारतीय सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 5 सप्टेंबर ला शिक्षक दिवस साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुद्धा ता.अहमदपूर जि.लातूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका जि.प.प्रा.शाळा रुद्धा सौ.साके मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक श्री काशीनाथ केंद्रे (गुरुजी) होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रा.पं. सदस्य तथा रा.यु.कॉ.जिल्हाउपाध्यक्ष लातूर श्री युवराज भगवान बदने यांनी केले. प्रास्ताविक करत असताना श्री युवराज बदने यांनी सांगितले की आपल्या जीवनात आपला कोणी योग्य मार्गदर्शक असेल तर तो आपला शिक्षक असतो आणि शिक्षक हाच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो आणि आपल्या जीवनाला एक चांगले वळण देण्याचे काम हा आपला शिक्षक करत असतो म्हणून शिक्षक हा माझ्या जीवणातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. आणि मी एक गावचा ग्रामपंचायत सदस्य या नात्याने आमचे नेते अहमदपूर-चाकूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार साहेब मा.श्री बाबासाहेबजी पाटील साहेब व खंडाळी गटाचे लोकप्रिय सदस्य मा.श्री माधवराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून लवकरच शाळेच्या भौतिक सुविधेसाठी चांगला फंड मंजूर करून देण्याचा विश्वास दिला. त्यानंतर जि.प. प्रा.शाळा शिक्षक कर्मचारी यांचा युवराज बदने यांच्या पुढाकारातून सत्कार करण्यात आला. रुद्धा गावातील सेवानिवृत्त शिक्षक श्री काशीनाथ केंद्रे (गुरुजी) यांचा सत्कार श्री शिवानंद शिंदे यांनी केला. जि.प.प्रा.शाळा मुख्याध्यापिका सौ.साके मॅडम यांचा सत्कार श्री बलभीम देवक्तते यांनी केला. जि.प.प्रा.शाळा शिक्षक श्री माने सर यांचा सत्कार ग्रा.पं.सदस्य श्री युवराज बदने यांनी केला…

सत्कार संभारभ कार्यक्रमानंतर उपस्थित काही विद्यार्थिनींने शिक्षक दिना निमित्ताने भाषण केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष मुख्याध्यापिका सौ साके मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळे त्या बोलत असताना म्हणाल्या आजचा दिवस हा शिक्षकांच्या जीवनातील खूप खूप मोठा व अआनंदाचा दिवस आहे शिक्षक व पालक यांच्यामध्ये जेव्हा जिव्हाळा निर्माण होतो तेंव्हाच एक चांगला विद्यार्थी घडला जातो आणि एक शिक्षक हा कित्येक पिढ्या घडवत असतो म्हणून समाजातील शिक्षक हा समाजाचा स्वाभिमान असावा म्हणून प्रत्येक गावातील समाजाने आपला शिक्षक जपला पाहिजे म्हणजे त्यांना सहकार्य केले पाहिजे आणि आजच्या दिवसाचे महत्व म्हणून त्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. व पुढे बोलताना म्हणाल्या रुद्धा ग्रामपंचायत सदस्य श्री युवराज भैया यांनी आज आमचा शिक्षक दिनानिमित्त जो हा सन्मान केला तो राष्ट्रपती यांनी केलेल्या सत्कार पेक्षा आमच्यासाठी मोठा वाटतो आहे असे म्हणत सर्व ग्रामस्थांचे ऋण व्यक्त केले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुद्धा येथील सहशिक्षक श्री माने सर यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले यावेळी माने सर यांनी आज श्री युवराजभाऊ बदने व ग्रामस्थांनी आमचा जो सन्मान केला तो सन्मान आमच्यासाठी आजच्या दिवशी बहुमोल असा सन्मान आहे असे म्हणत आभार न मानता रुद्धा ग्रामस्थांचे आम्ही कायम ऋणी आहोत असे म्हणाले. यावेळी बलभीम देवक्तते , ग्रामपंचायत सदस्य श्री युवराज बदने , श्री शिवानंद शिंदे ,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री मारोती सुरणर , बळीराम केंद्रे , रविकांत केंद्रे , बालाजी नागरगोजे , श्याम गित्ते इत्यादी उपस्थित होते.

About The Author