अहमदपूर शहरात अवैध डीझेल सदृश्य इंधन विकणाऱ्या वाहनावर गुन्हा दाखल

अहमदपूर शहरात अवैध डीझेल सदृश्य इंधन विकणाऱ्या वाहनावर गुन्हा दाखल

अहमदपूर (गोविंद काळे ) : मा.जिल्हाधिकारी लातूर यांनी लातूर जिल्ह्यात बायोडिझेल व बनावट डिझेल अवैध विक्री करणाऱ्या विरुद्ध शोध मोहीम घेऊन कार्यवाही करण्यासाठी अहमदपूर तालुक्यासाठी पथक नियुक्त केले होते. सदर पथकात श्री. प्रसाद कुलकर्णी तहसीलदार अहमदपूर हे पथक प्रमुख होते व त्यांना सहाय्यक म्हणून नायब तहसिलदार जी आर. पेद्देवाड, बी. जी. मिट्टेवाड व BPCL कंपनीचे व्यवस्थापक पंकज यादव हे होते या व्यतिरिक्त IOCL कंपनीचे अनिल धापोडकर HPCL कंपनीचे कल्पेश मोर्या व नागोराव जाधव पोलीस उप निरीक्षक अहमदपूर, तलाठी अहमदपूर माधव जोशी कोतवाल गुंडेवाड हे होते. वरील पथक दिनांक 24.08.2021 रोजी 4.00 वाजता बायोडिझेल / बनावट डिझेल अवैध विक्री अहमदपूर शहरात होत आहे का याचा शोध घेत असताना अहमदपूर ते शिरूर ताजबंद रोडवर निसर्ग नर्सरीच्या समोर महिंद्रा बोलेरो कंपनीचे (पिक अप) वाहन क्र MH – 26 – B – 7568 मध्ये अंदाजे 1000 लिटरच्या लोखंडी टाकी मध्ये टाकीच्या मागील बाजूस dispenser unit द्वारे सदर वाहनाचा चालक डिझेल सदृश्य इंधन विकत होता तो पथकास पाहून पळून गेला. सदर टाकीमध्ये डिझेल सदृश्य इंधन अंदाजे 400 लिटर आढळून आले. त्यामुळे सदरील वाहनाच्या चालकाविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 अन्वये गुरन 388/2021 अन्वये जी. आर. पेद्देवाड नायब तहसिलदार यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ऐन. व्ही. लाकाळ करीत आहेत.

About The Author