नवदृष्टी देणारे आरोग्य शिबिरासारखे उपक्रम हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम – माजी आ. सुधाकर भालेराव.
उदगीर (एल पी उगीले) आरोग्यदायी उपक्रम याच्यामुळेच समाज परिवर्तन घडू शकेल एका अर्थाने नवी दृष्टी देणारी अशी उपक्रम ठरतात. असे विचार शिवसेनेचे जिल्हा संघटक प्रथम माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी व्यक्त केले. दि.२८ जून रोजी मौजे करडखेल ता.उदगीर येथे महाआरोग्य शिबीर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. डोक्यातील मौजे करडखेल खरेदी हा कार्यक्रम संपूर्ण झाला.
दि.२९ जून रोजी आतनूर जळकोट येथे तर ,दि.३०जून रोजी उदयगिरी लॉयन्स धर्मदाय रुग्णालय,उदगीर येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण कॅबिनेट मंत्री ना श्री प्रकाशजी आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा शिवसेना उदगीर विधानसभा व उदयगिरी लॉयन्स क्लब च्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न झाले,या शिबिराचे उदघाटन माजी आ सुधाकर भालेराव यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीती उमेश सनगले सामाजिक कार्यकर्ते,अनिल पंचाक्षरी विधानसभा प्रमुख,व्यंकट कसबे सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष, उदयगिरी लॉयन्स धर्मदाय रुग्णालय जनसंपर्क अधिकारी गणेश मुंडे, नेत्रचिकिस्तक डॉ केंद्रे ,मनोज पाटील ता.प्रमुख, सतीश कांबळे, ता.प्रमुख सामाजिक न्याय,गजानन पांचाळ,राम ताई वाघमारे महिला ता.अध्यक्ष सामाजिक न्याय,कांताबाई सूर्यवंशी,दयानंद गुंडरे ओ बी सी ता.अध्यक्ष,बाळू शिंदे शहर समन्वयक,नटवरलाल सकट, शहरप्रमुख सामाजिक न्याय,राम स्वामी,मनोहर कसबे,माधव कसबे, गुवंत कसबे,माधव कसबे,पोलीस पाटील एकनाथ कसबे,माणिक हलसे,मारोती गायकवाड,महेश मंदाडे,धोंडीराम बुरले,श्यामद पठाण, राम निडवंचे,अविनाश कसबे आदी शिवसेना व सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिरात यावेळी १८१ रुग्णांची तपासणी झाली व ५८ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी पात्र झाले.
