उदगीर ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ३ लाख ७३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी ताब्यात.

0
उदगीर ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ३ लाख ७३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी ताब्यात.

उदगीर (एल पी उगीले) पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत उदगीर ग्रामीण पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत ३ लाख ७३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर चार आरोपी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाले. जळकोट रोड, इंडिया नगर, उदगीर येथील एका हॉस्पिटलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत झागीरदार यांच्या शेताजवळील पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती ‘तीरट’ नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उदगीर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला.
छाप्यामध्ये वसीम दस्तगीर शेख (वय २५, रा. हावगीस्वामी मठ चौक, उदगीर) व आमेर बशीर हाश्मी (वय ३२, रा. दर्गा चौक, उदगीर) हे जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले. तर
शकील राजमहम्मद लदाफ,बबलू खाँजा सय्यद,खाँजा युसुफ शेख,
आशपाक बारी पटेल हे चार आरोपी पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगाराचे साहित्य, ४ मोटारसायकली, ३ मोबाईल फोन, १ ऑटो रिक्षा आणि रोख रक्कम असा एकूण ३,७३,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४४३/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अमलदार केंद्रे हे करीत असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!