स्मार्ट मीटर ग्राहकाला न विचारता लावल्यास शिवसेना आंदोलन करणार – स्वप्निल अण्णा जाधव
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर विधानसभा मतदारसंघात वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय किंवा काही ठिकाणी त्यांची दिशाभूल करून स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. स्मार्ट मीटर बसवणे तात्काळ बंद करावे. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्नील अण्णा जाधव यांनी दिला आहे.
तशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उदगीर च्या कार्यकारी अभियंता यांना शिवसेनेच्या वतीने दिले आहे. यावेळी स्वप्निल अण्णा जाधव यांच्या समवेत शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत मोरे, उपतालुकाप्रमुख महेश फुले, शिवकांत चटनाळे, तालुका समन्वयक व्यंकट साबणे, शाखाप्रमुख माधव शेलाळे, विभाग प्रमुख शिवाजी मुरारीकर, शाखाप्रमुख दत्ता पलंगतोडे, तालुका सचिव अरुण बिरादार, ओम पेंढारकर, दीपक पेंढारकर, बालाजी डोंगरे इत्यादी शिवसैनिकही उपस्थित होते.
निवेदन दिल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्वप्नील अण्णा जाधव यांनी सांगितले की, शिवसेनेच्या वतीने एक वर्षापूर्वीच निवेदन दिलेले असताना देखील स्मार्ट मीटरचा अट्टाहास महावितरण कंपनीच्या वतीने केला जात असल्याचे अनेक गावातील लोकांनी सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे. स्मार्ट मीटर लावल्याने ग्राहकाचे नुकसान होत असून सुरळीत चालू असलेले मीटर काढून हे स्मार्ट मीटर का लावले जात आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
स्मार्ट मीटर लावणे तात्काळ बंद करावे. अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करून ही मोहीम बंद पाडली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
