रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ॲड. विक्रम संकाये,उपाध्यक्षपदी विजयकुमार पारसेवार,

0
रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ॲड. विक्रम संकाये,उपाध्यक्षपदी विजयकुमार पारसेवार,

उदगीर (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या अध्यक्षपदी ॲड.विक्रम संकाये यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विजयकुमार पारसेवार तर सचिवपदी डॉ. सुधीर जाधव यांची निवड करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या २०२६-२७ च्या पदाधिकारी निवडीसाठी सहा. प्रांतपाल नागनाथ आगावणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीला मावळते अध्यक्ष प्रशांत मांगुळकर, उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे सचिव विक्रम हलकीकर यांची उपस्थिती होती.
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या 2026-27 च्या अन्य कार्यकारिणी मध्ये कोषाध्यक्ष निशांत धवलशंख, लर्निंग ट्रेनर विशाल तोंडचीरकर, आयपीपी प्रशांत मांगुळकर, सहसचिव ॲड. मंगेश साबणे, सार्जंट ॲट आर्मस अजय अंबेसंगे, मेंबरशिप डायरेक्टर मंगला विश्वनाथे, टीआरएफ डायरेक्टर किशोर पंदीलवार, डिस्ट्रीक्ट डायरेक्टर मोतीलाल डोईजोडे, वुमन एम्पॉयर महानंदा सोनटक्के, युथ सर्विस आशिष अंबरखाने, कम्युनिटी डेव्हलपमेंट बिपिन पाटील, सीएसआर प्रोजेक्ट चेअरमन सागर महाजन, सर्विस प्रोजेक्ट संतोष फुलारी, व्होकेशनल सर्विस राम सोनटक्के, पब्लीक इमेज विक्रम हलकीकर, क्लब सर्विस गजानन चिद्रेवार,
इंटरनॅशनल सर्विस रामेश्वर निटूरे, ह्युमन डेव्हलपमेंट सुधीर जगताप, फेलोशिप भागवत व्यंकट कणसे, व्हॅक्सिनेशन चेअर संगमेश्वर दाचावार, विन्स चेअर प्रमोद शेटकार, डिस्ट्रीक्ट एम्पॉसिस चंद्रकांत ममदापुरे, बुलेटीन एडिटर रवींद्र हसरगुंडे , आय. टी. मिडीया अभिजित पटवारी, हेल्थ सर्विसेस पवन मुत्तेपवार , फंडरायझिंग चेअर राहुल मुचेवाड, स्पोर्ट चेअर ज्योती स्वामी , कल्चरल संचालक भागवत केंद्रे, मेगा सर्जिकल कॅम्प डॉ.दत्तात्रय पाटील, युथ सर्विसेस सरस्वती चौधरी, ग्लोबल सर्व्हिस प्रोजेक्ट चेअरमन अन्नपूर्णा मुस्तादर, लोकल सर्व्हिस प्रोजेक्ट चेअरमन ज्योती चौधरी यांचा समावेश आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!