लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून मुख्य कामास गती द्या..!

लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून मुख्य कामास गती द्या..!

राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांच्याकडे मागणी..!!

अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर-नांदेड या महामार्गावर पडलेले खड्डे तातडीने बुजवून रस्ता बांधणीच्या कामाला गती देण्याची आग्रही मागणी युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पाटील यांची भेट घेवून निवेदनाद्वारे केली आहे. नूकतेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नांदेड येथील कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते तथा युवकनेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी एका शिष्टमंडळासह पाटील यांची भेट घेतली.या वेळी लातूर ते नांदेड या रस्त्यावर प्रामुख्याने आष्टामोड,चाकूर,चापोली,शिरूरताजबंद,अहमदपूर ते पूढे लोहा या भागात अनेक ठिकाणी पावसामुळे बरेच खड्डे झाले आहेत. त्यामूळे वाहनधारकांना कसरत करत वहाने चालवावे लागत असून याचा नागरीकांना त्रास होत असल्याची माहिती पाटील यांना दिली.

यावेळी पाटील यांनी माहीती दिली आहे की,सध्या युद्ध पातळीवर रस्त्याचे काम चालू असून रस्त्याच्या एका बाजूने सिमेंट काँक्रिट करण्याचे काम आता सूरूवात करण्यात आले आहे.प्रत्येक 20 कि.मी.साठी प्लॅन्ट लावून हे काम करण्यात येत आहे.साधारणतः पूढील महीना भरात एका बाजूचे काँक्रिट झाल्यानंतर लगेच दुसर्या बाजूचे काम करण्यात येणार आहे.सध्या अस्तित्वात असलेला पूर्वीचा रस्ता मोटरेबल करण्यात आला आहे मात्र पावसाळ्यामूळे यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळा असल्याने डांबरीकरण करता येत नाही त्यामुळे मूरूम आदी साहित्याच्या माध्यमातून पॅचअप करण्याच्या सूचना संबंधीतांना आजच देण्यात येतील. पूढील कांही महीन्यात अतीशय दर्जेदार रस्ता होणार आहे. काम प्रगतीपथावर असल्याने या रस्त्यावर प्रवास करताना वहान धारकांनी वेग मर्यादेचे पालन करावे असेही अवाहन केले. यावेळी या शिष्टमंडळात जगताप, अमोल भालेराव,सचिन कांबळे यांची उपस्थिती होती

About The Author