आ. बाबासाहेबजी पाटील यांच्या हस्ते घनकचरा संकलन, वर्गीकरण प्रक्रिया व पूर्नवापर प्रकल्पाचा शुभारंभ
अहमदपूर (गोविंद काळे) : येथे नगर परिषद, अहमदपूरच्या माध्यमातून आणि 15 व्या वित्त आयोग अंतर्गत शहरातील घनकचरा संकलन, वर्गीकरण प्रक्रिया व पूर्नवापर करणे आणि अनुषंगीक कामाचा शुभारंभ आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.या प्रकल्पामुळे शहरातील प्रदूषण तर कमी होईलच पण त्याचबरोबर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून आपलं अहमदपूर ओळखलं जाईल. या माध्यमातून शहरातील ओला, सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने गोळा केला जाणार आहे. त्यानंतर या कचऱ्याचे वर्गीकरण प्रक्रिया करून पूर्नवापर करता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचा खत उपलब्ध होईल. शहरातील कचऱ्याचे प्रदूषण कमी होईल. आज या प्रकल्पाचा शुभारंभ केला लवकरात लवकर यंत्रणा कामाला लावण्याच्या सूचना देखील दिल्या.
यावेळी नगराध्यक्ष सौ.अश्विनी कासनाळे, काँग्रेस आय जिल्हा सरचिटणीस सांब महाजन, जि.प. सदस्य माधवराव जाधव, नगरसेवक अमित रेड्डी, अभय मिरकले, सय्यद सरवरलाल, अझहर बागवान, पांडुरंग मिरकले, वसंतराव शेटकर, लक्ष्मीकांत कासनाळे, रवी महाजन, संदीप चौधरी, आशिष तोगरे, बाबूभाई रुईकर, अफरोज पठाण, फेरोज शेख, हुसेन मणियार, दस्तगीर शेख, दयानंद पाटील, श्याम देवकत्ते, कमलाकर नळेगावकर, अजिज काझी, मुसा शेख, चंद्रशेखर भालेराव, सुनिल सोनकांबळे, संदीप वाघंबर, अशोक सोनकांबळे, संदीप शिंदे, सय्यद नबी, अशोक कल्याने, धम्मपाल ढवळे, राणीताई गायकवाड, यांच्यासह सर्व कामगार उपस्थित होते.