शिक्षक व शिक्षणामुळेच एक आदर्श राष्ट्रप्रेमी नागरीक सदैव घडत असतात – किरण भावठाणकर
लातूर (प्रतिनिधी) : श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षक , उपक्रमशील शिक्षक व आदर्श शिक्षक यांचा सत्कार संपन्न झाला
शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आचार विचार व जडनघडणीत मोलाचे कार्य करतो संस्कारी नीतीमुल्य जोपासणारी पिढी निर्माण करून त्यांच्यात आदरभाव आदर्श राष्ट्रप्रेमी नागरीक बनवण्यासाठी शिक्षक व शिक्षणामुळेच साध्य होते असे अध्यक्षीय भाषणात किरणराव भावठाणकर म्हणाले.
श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमीत कार्यक्रमात आयोजीत केला होता शाळेत बरेच उपक्रम हे सातत्यपुर्ण घेतले जातात ,त्यातीलच एक म्हणजे शिक्षक दिन दरवर्षी सेवानिवृत्त शिक्षक आदर्श शिक्षक यांचा आदरयुक्त सत्कार केला जातो
या वेळी उपक्रमशील शिक्षिका सौ. कल्पनाताई भट्टड व केशवराज प्राथमिक विद्यालयातील आदर्श शिक्षिका सौ.सारिका भायेकर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. विवेकराव आयाचीत सर, प्रमुख उपस्थिती म्हणून शालेय समिती अध्यक्ष मा.डॉ.मनोज शिरुरे सर शिक्षीक कल्पना भट्टड हे उपस्थित होते.या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत देशपांडे बाई यांनी केले. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाची माहिती श्री गवळी सर यांनी सांगितली .त्यानंतर दोन्ही सत्कार मूर्तींचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सौ. कल्पना भट्टड यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्या म्हणाल्या की शिक्षक हा आदर्शच असतो व तो आदर्श असायलाच पाहिजे .त्यांनी यावेळी दृष्टिकोण व शिक्षक दिन या दोन विषयावर छान कविता सादर केली आपण घेत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली . तसेच त्यांनी स्नेहस्मृती नावाचे आत्मचरित्र भेट दिले सौ .सारिका भायेकर यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले की आमच्या ज्येष्ठ शिक्षकांनी आमच्यात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला व विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या देऊन मा.मुख्याध्यापक सरांनी काम करण्याचा आत्मविश्वास निर्माण केला.
असे म्हणाल्या तसेच आयचीत सर यांनी आपल्या मनोगतात अशा सकारात्मक सत्कारातुन शिक्षकांना एक ऊर्जा मिळते व शिक्षकांचे महत्व कळते असे म्हणाले त्यानंतर सेवानिवृत्त शिक्षक आदरणीय श्री संदिकर दादा यांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन मा. मु. अ. श्री हेंडगे सर यांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर सौ. मद्दे बाई यांनी ‘निर्मानो के पावन युग मे’ हे पद्य खूप छान सादर केले.
सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमासाठी संस्थेतील काही सेवानिवृत्त शिक्षक सुद्धा आभासी पद्धतीने सहभागी होते तसेच शिक्षकांचे आराध्यदैवत असणारे विद्यार्थी ,तसेच पत्रकार पालक ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रस्तावीक मुख्याध्यापक हेंडगे सर व आभार सौ.वखरे बाई यांनी मांडले तसेच सूत्रसंचलन सौ. चिंते मॅडम यांनी केले या कार्यक्रमामुळे श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला.