वर्षाराणी मुस्कावाड यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार
उदगीर ( प्रतिनिधी ) : शांतिनिकेतन विद्यालय कोदळी येथील सहशिक्षिका, लेखिका सौ. वर्षाराणी ज्ञानोबा मुस्कावाड यांना शैक्षणिक दीपस्तंभ या संस्थेकडून दिला जाणारा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार वर्ष २०२१ प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात उज्वल कामगिरी करुन एक चांगला नागरिक बनवण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार शिक्षक दिनादिवशी प्रदान केला जातो.
वर्षाराणी मुस्कावाड या उदगीर तालुक्यातील कोदळी गावातील शांतिनिकेतन विद्यालय येथे सहशक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांचे साहित्य क्षेत्रात ही उल्लेखनीय कार्य आहे. विविध मासिकात व वर्तमानपत्रात त्याचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या विद्यालयात विविध उपक्रम राबवतात. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत सहभागी करुन त्यांना बक्षीस मिळवून दिले आहे. त्यांना कविता करणे, गीत गायन करणे याचीही आवड आहे.
वर्षाराणी मुस्कावाड यांच्या शिक्षणक्षेत्रातील उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन शैक्षणिक दीपस्तंभ या संस्थेकडून २०२१ चा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वर्षाराणी मुस्कावाड यांचे अभिनंदन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपे, केंद्र प्रमुख शिवशंकर पाटील, मुख्याध्यापक सुकानंद वडले, एनसीसी अधिकारी बालाजी मुस्कावाड, शैक्षणिक दीपस्तंभ चे अध्यक्ष सुदाम साळुंके अहमदनगर, सहसंपादक वैशाली भामरे नाशिक, उपाध्यक्ष धनराज सूर्यवंशी लातूर, विवेक होळसंबरे, शांतिनिकेतन विद्यालय कोदळी येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.