श्यामार्य कन्या विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आले
उदगीर ( प्रतिनिधी ) : श्यामार्य कन्या विद्यालयात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांच्या उपस्थितीत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका श्रीमती ज्ञाते टि. के या होत्या. मुख्याध्यापिका यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना लेखणी व पुष्पगुच्छ देऊन सर्व शिक्षकांचे कौतुक व गौरव करण्यात आले.
भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे.
असे मनोगतातून श्री हुरदळे यांनी आपले मत व्यक्त केले .
श्रीमती खादिवाले यांनी आपल्या काव्य रचनेतून सर्व शिक्षक व शिक्षकांचे स्वरचित काव्य मधून त्यांच्या कर्तृत्वाचे काव्यात्मक वर्णन केले.
शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षणा देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचा महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. असे मत अध्यक्षीय समारोपातून श्रीमती ज्ञाते यानी आपले मत व्यक्त केल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नेत्रगाव मदन पाटील आणि आभार श्रीहरी निडवंचे यांनी व्यक्त केले .