राजमाता जिजाऊ व राष्ट्भक्‍त स्वामी विवेकानंदाची प्रेरणा घेउन देशासाठी कार्य करू – शिवाजीराव पाटील कव्हेकर

राजमाता जिजाऊ व राष्ट्भक्‍त स्वामी विवेकानंदाची प्रेरणा घेउन देशासाठी कार्य करू - शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : सोळाव्या शतकामध्ये अदीलशाही,कुतूबशाही मोगला सारख्या परकियाची जूलमी सत्‍ता भारतदेशावर होती. ते देशाचे सर्व प्रकारचे शोषण करून अन्याय करत होते. त्या विरूध्द लढण्याची उर्जा शक्‍ती रामायण महाभारताचे दाखले देउन राजमाता जिजाउ यांनी बालशिवाजी महाराजाना दिली त्यामुळेच ते दृढ आत्मविश्‍वासी लढवैय्य व जनतेचे पोशिंदे स्वराज्य निर्माते म्हणून उदयास आले. अशा महाण मातेला आम्ही वंदन करत आहोत.
राष्ट्भक्‍त स्वामी विवेकानंदाणी 18 व्या शतकामध्ये अमेरीका मधील शिकागो येथील धर्म परिषदेमध्ये भारत देशाची मुळ संस्कृती, समर्पीतभाव, मानवतावादी, परोपकारी, अध्यात्मवादी असल्याची मांडणी आत्मविश्‍वासानी केली त्यामुळे जग भारतात पुराणमतवादी आनाडी लाकांचा देश समजत होते ती विचार बाजूला जाउन भारताविषयी आदराची चांगली भावना जगात निर्माण केली.

विवेकानंदानी सर्व जिवण देशातील पुरानमतवादी भोगळवाद दूर करून वेदावरती आधारीत खराधर्म काय आहे तो सांगन्याचा प्रयत्न केला. स्वामीजी म्हनत तुमच्यामध्ये त्रीलोकज्ञान भरलेले आहे त्याला जे शिक्षण प्रकट करेल ते खरे शिक्षण आहे स्वामी विवेकानंदाचे देशावरती प्रचंड प्रेम विश्‍वास होता त्याच्यामध्ये प्रचंड आत्मविश्‍वास होता ते म्हणत भारत देश महान विभुतिचा विचाराचा देश आहे यांनी जगाला शिक्षा व ज्ञान दिले आहे हा देश 21 व्या शतकात जगाचे नेतृत्व करेल अशी भविष्यवानी केल्याची माहीती जे.एस.पी.एम. लातूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी विवेकानंद पुरम येथील कार्यक्रमात भावणा व्यक्‍त केल्या. या प्रसंगी प्राचार्य साखरे सर, विनोद जाधव, प्रा.गायकवाड सर, प्राचार्य जोशी सर, मुख्याध्यापक खुर्दळे, बिराजदार, आशा जोशी, स्वेता चव्हाण, चंद्रशेखर पाटील, शरद चिद्रेवार, आदी मान्यवर उपस्थीत होते.

About The Author