माणसातला देवमाणूस – प्रकाश पोपटराव गडाख
नाशिक ( रोहित टोंम्पे) : चांदोरी ग्रामपालिकेचा एक भाग वार्ड क्रमांक तीन (2600) लोकवस्तीचा प्रभाग आणि या ठिकाणी (400) लोकवस्तीचा मेंढवाडा गेल्या चाळीस वर्षापासून पिण्याचे पाणी नसून वंचित आहे.
सविस्तर वृत्त असे की चांदोरी मेंढवाडा या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षापासून
निस्वार्थपणे पिण्याच्या पाण्याची सोय करणारा माणसातला देवमाणूस चांदोरी गावचे भूमिपुत्र प्रकाश पोपटराव गडाख यांनी स्वखर्चाने पाईपलाईन करून गोरगरिबांना तसेच जिल्हा परिषद शाळेस पिण्याचे पाणी गेल्या चाळीस वर्षांपासून देताय गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील दुःख जाणून निःस्वार्थ सेवा करण्याच्या प्रयत्न हे गडाख कुटुंब करत असून मी लसीकरण चालु असताना फेरफटका मारला समोरची परिस्थिती जाणून घेतली आणि मला प्रकाश काका सोबत बोलण्याचा मोह आवरला नाही……
काकांनी आता पर्यंत केलेल्या जनसेवेची माहिती दिल्यानंतर मी काही वेळ स्तब्ध झालो..मध्यंतरी विहीर कोरडी पडत असताना माझ्या शेतातिल द्राक्ष बाग झाली नाही तरी चालेल पण गोरगरिबांना नक्कीच पाणी कमी पडू देणार नाही अशी निस्वार्थी वृत्ती ठेवून जनसेवा करत आहे राजकारणाचे कुठल्याही प्रकारचे वेड नसलेलं हे कुटुंब….
या पुढील काळात अशीच सेवा घडत राहो या महान व्यक्तीस चांदोरी ग्रामस्थांच्यावतीने खूप खूप आभार यापुढील काळात जनसेवा करण्याची ताकद मिळत राहील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही.