लातूरचे सुपुत्र सपोनि राम गोमारे यांचा कमिशनर यांच्या हस्ते सत्कार

लातूरचे सुपुत्र सपोनि राम गोमारे यांचा कमिशनर यांच्या हस्ते सत्कार

 पुणे (केशव नवले) : पिंपरी चिंचवड येथील गुन्हे शाखेतील सपोनि राम गोमारे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल विशेषतः गुंतागुंतीचे खून प्रकरण आणि जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक केल्याबद्दल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सपोनि राम गोमारे यांचा सत्कार केला.

 यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पिंपरी येथील एकाने जुन्या भांडणाचा राग मनात धरून कांदा कापण्याचे सुरीने गळा चिरून खून करून आरोपी फरार झाला होता. त्या आरोपीला बारा तासाच्या आत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकाने तात्काळ कारवाई करून आरोपीस अटक केली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, उपनिरीक्षक राहुल कोळी, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसोडे ,सावन राठोड, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने ,दयानंद खेडकर, संदीप ठाकरे, श्यामसुंदर गुटे, गणेश मालुसरे यांच्या पथकाचा समावेश होता.

 तसेच मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पिंपरी चिंचवड शाखेच्या पथकाने छडा लावला होता. या आणि अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये सपोनि राम गोमारे यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला बद्दल त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

About The Author