शेतकरी व प्लॉटधारकांची अडचण ठरणारे परिपत्रक तात्काळ रद्द करावे – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : सध्या 7 पाणी, दिड पाणी, गुंठेवारी एन.ए.असलेल्या प्लॉटची रजिस्ट्री होत नाही. जमिनीच्या रेखांकणानंतरच रजिस्ट्री असे परिपत्रक राज्य शासनाने काढलेले आहे. यामुळे प्लॉटधारक व रजिस्ट्रीधारकाबरोबरच 82 टक्क्यावर असणार्या अल्पभूधारक शेतकर्यांचीही अडचण होत आहे. त्यामुळे शेतकरी व प्लॉटधारकांची अडचण ठरणारे 12-7-2021 चे हे परिपत्रक तात्काळ रद्द करावे अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल. असा ईशारा भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी समस्त लातूरकर संघर्ष समितीच्यावतीने आयोजित एक दिवशीय निदर्शने आंदोलनात बोलताना दिला.
यावेळी समस्त लातूरकर संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. मनोहर गोमारे, प्रदिप पाटील खंडापूरकर, प्रहारचे कालिदास माने, भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर,धनराज साठे, कुलदिपसिंह ठाकूर, लष्कर-ए भिमा संघटनेचे अध्यक्ष रणधीर सुरवसे, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, बाळासाहेब जाधव, उमेश हांडगुळे, महाराष्ट्र विकास आघाडीचे नाजम शेख, रामेश्वर धुमाळ यांच्यासह समस्त लातूरकर संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थीत होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, हा प्रश्न फक्त लातूर जिल्हयाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. प्लॉट धारक व रजिस्ट्री धारका बरोबर अल्पभुधारक शेतकर्यांचा आहे.त्या मुळे या प्रश्नाबाबत राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, व या रजिस्ट्री विभागाचे आय.जी.आर. हार्डीकर यांच्याशी बोलून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सक्रीय पणे पाठपूरावा करू असा विश्वासही त्यांनी उपस्थीत आंदोलन कर्त्याना दिला.
यावेळी धनराज साठे, नाझम शेख, कुलदीपसिंह ठाकूर, संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष रामदास पवार, प्रहारचे कालिदास माने, आदींनी मनोगतातून आंदोलनाची पुढील दिशा ठरविली. दरम्यान लातूरचे पालकमंत्री आ. अमित देशमुख यांनाही यातील विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासणार – प्रदिप पाटील खंडापूरकर
सध्या 7 पाणी एन.ए., दिड पाणी एन.ए.व गुठेवारी एन.ए. केले जात नाहीत यामुळे सर्वसामान्य नागरीकांना आनेक आडचणीला सामोरे जावे लागत आहे. याकडे लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लक्ष द्यावे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना अनेक आंदोलने व्हायची परंतु साहेबांना आंदोलनकर्त्यांनी भेटताच प्रश्न मार्गी लागायचे त्यामुळे आताही पालकमंत्र्यांनी लक्ष देवून सर्वसामान्यांचा रजिस्ट्रीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा याबाबत लोकशाही पध्दतीने आम्ही आंदोलन करीत आहोत. पंरतु तरीही न्याय न मिळाल्यास या प्रश्नासाठी सबंधीत कार्यालयातील अधिकार्यांच्या तोंडाला प्रसंगी काळे फासण्याचे काम करू, असा ईशारा भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर यांनी दिला आहे.
लातूरकरांसाठीच्या लढ्याला भाजयुमोचा पाठींबा – अजितसिंह पाटील कव्हेकर
सध्या रजिस्ट्रीच्या कामाला अडचणी येत आहेत. सात पाणी, दिड पाणी, व गुुंठेवारी, एन.ए.चे काम रेखांकणाशिवाय रजिस्ट्रीचे काम होत नाही. सुरळीत व्यवस्थेत बिघाड करून पैसे छापण्याचे काम या परिपत्रकाच्या माध्यमातून अधिकार्यांनी सुरू केलेले आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे लातूरकरांसाठीच्या लढ्याला भाजयुमोचा जाहीर पाठींबा दर्शवून आम्ही लातूरकरांच्या प्रश्नासाठी सदैव पुढेच राहूत अन् लातूरकरांचे प्रश्न मार्गी लावू, असा विश्वास भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केला.
वरीष्ठांकडे पाठपुरावा करू..!
रजिस्ट्री प्रकरणातील अडचणीबाबत भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी रजिस्ट्री विभागाचे आय.जी.आर. हार्डीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्वसामान्यांसाठी अडचणीचे ठरलेल्या परिपत्रकाबाबत राज्याचे सचिव करीर यांच्याकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले तर उपसचिव बनकर यांच्याशी संपर्क साधला असता सबंधीत मंत्री व सचिव साहेबांना बोलून यावर तोडगा काढू असा सकारात्मक प्रतिसाद दिला.