मौजे धसवाडी येथे कोव्हॅक्सीन लसीकरण शिबीर

मौजे धसवाडी येथे कोव्हॅक्सीन लसीकरण शिबीर

१८० लाभार्थी यांनी लाभ घेतला

खंडाळी (गोविंद काळे) : प्रा.आ.केंद्र अंधोरी तालुका अहमदपुर अधिनस्त आरोग्य वर्धिनी केंद्र खंडाळी अंतर्गत मौजे धसवाडी तालुका अहमदपुर येथे कोव्हॅक्सीन लसीकरण शिबीर आयोजित करण्यात होते.आज पर्यंत खंडाळी येथील समुह आरोग्य अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी यांनी खंडाळी अंतर्गत सर्व गावांचे सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य,पोलिस पाटील, गावातील प्रतिष्ठीत व जेष्ठ नागरिक, पत्रकार यांचेशी समन्वय साधून लसीकरणाचे महत्व सांगून, लसीकरण शिबीरे आयोजित करुन, प्रसिध्दी जास्तीत जास्त लोकांपर्यंत करुन आतापर्यंत पहिले डोसेस १६०७ व दुसरा डोस ४२९ असे एकुण २०३६ लाभार्थी यांना लसीकरण करण्यात आले आहे. रोजी मौजे धसवाडी येथील लसीकरण शिबीरामध्ये पहिला डोसेस १३९ व दुसरा डोस ४१ असे एकुण १८० लाभार्थी यांना लसीकरण करण्यात आले आहे.या लसीकरण शिबीरामध्ये डॉ.कुभार समुह आरोग्य अधिकारी,श्री पी.व्ही दराडे आरोग्य सेवक, ऐश्वर्या ठाकूर आरोग्य सेविका,सौ.सुरेखा पांचाळ,आशा कार्यकर्ती,बालिका सुंरसे, अंगणवाडी कार्यकर्ती,श्रीमती अयोध्या कामखेडकर अंगणवाडी कार्यकर्ती, श्री डाखोरे सर आॅनलाईन तंत्रस्नेही,शाळेचे मुख्याध्यापक व सहशिक्षक यांनी सहकार्य केले आहे.लसीकरण शिबीर यशस्वी करणे व प्रसिध्दी करण्यासाठी श्री प्रेमचंद दिगंबरराव दुर्गे सरपंच,श्री चंद्रकांत देशमुख उपसरपंच, सर्व सदस्य, पोलिस पाटील व गावातील अनेक हितचिंतकांनी सहकार्य केले आहे.

About The Author