शिरुर ताजबंद बस स्थानकात अज्ञात वहानाच्या धडकेने बैलवाडे ठार

शिरुर ताजबंद बस स्थानकात अज्ञात वहानाच्या धडकेने बैलवाडे ठार

ताजबंद (गोविंद काळे) : येथील बस स्थानकात थोरलीवाडी ता. अहमदपूर अंबादास लिंबाजी बैलवाडी वय ५३ वर्षे यास अज्ञात वाहणाने चिरडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.८ सप्टेंबर रोजीवार बुधवारी रात्री अंदाजे ७ ते ८ वाजता घडली. शिरुर ताजबंदचे बसस्थानक हे गैरसोयीचे माहेरघर आहे. शिरुर ताजबंद येथील सामाजीक कार्यकर्ते विक्रम भोसले ,गजेंद्र वलसे,मारोती मोरे,शाम सोनटक्के व ईतर शिरुर ताजबंद येथील नागरीक बसस्थानकाबाहेर थांबले होते .बसस्थानकात अंधाराचे साम्राज्य असताना कांहीतरी धडकण वाजल्याच्या आवाज आल्याने मोबाईलच्या उजेडाने बसस्थानकात काय वाजले म्हणुन पाहण्यासाठी गेले असता थोरलीवाडी येथील अंबादास लिंबाजी बैलवाडे वय ५३ वर्ष अज्ञात वाहनाच्या धडकेने पडलेले दिसले त्वरित शिरुर ताजबंद पोलीस चौकीचे पोलीस जमादार समुखराव यास फोनवरून माहीती त्यास उपचारासाठी म्हणुन शिरुर ताजबंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी मारोती पाटील यांनी मृत घोषीत केले. बातमी रात्री ९.४५ वाजे पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिय चालू असल्याची माहीती ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र वलसे यांनी दिली.

About The Author