विघ्नहर्ता आगमनासाठी सज्ज कोरोनाचा यावर्षी पण शिल्पकारावर संकट

विघ्नहर्ता आगमनासाठी सज्ज कोरोनाचा यावर्षी पण शिल्पकारावर संकट

अहमदपूर (गोविंद काळे) : गणेशोत्सव आता अवघ्या एक दिवसावर आला आहे.अहमदपूर येथिल प्रसिद्ध मूर्तीशिल्पकार अविनाश धडे व कु.श्रुती धडे यांनी शासनाच्या आदेशानुसार लहान आकाराचे गणेशमूर्तीं साकारले आहेत. या वर्षीही मूर्तींच्या मागणीत विलक्षण घट झाल्याने मूर्तीकार संकाटात सापडले आहे. अहमदपूर येथील मूर्तिकार अविनाश धडे यांनी मागील २५ वर्षापासून अनेक विलोभनीय आणि आकर्षक गणेशमूर्ती साकारलेल्या आहेत. या मूर्ती साकारताना मूर्तीचं वजन कमी करण्याचा त्यांचा नेहमीचा प्रयत्न असतो. विलोभनिय व आकर्षक रंगकामातील यांच्या मूर्ती मनमोहून टाकतात. यांच्या गणेश मूर्तीला अहमदपूर शहरात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या वर्षी कोरोना महामारीमुळे मूर्ती साकारण्यासाठी लागणारे साहित्य हवे तशा प्रमाणात किंवा योग्य भावात मिळत नाही. लागणाऱ्या कच्या मालाचा भाव गगणाला मिळाले आहेत. यामूळे यावर्षी गणेश मूर्त्यांच्या किमतीत वाढ झालेली आहेत. संस्कृती जपताना,सण साजरा केले जात असताना आपल्या कोणत्याही कृतींमुळे निसर्गाला धोका पोहचता कामा नये.याची काळजी आपणच घेतली पाहिजे. याकरिता अनेक संस्था पुढे येत आहे ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे.त्यामुळे खऱ्या अर्थाने यंदाचा बाप्पा सबंध महाराष्ट्रात चार ते पाच फुट उंचीचेच असणार आहे. पर्यावरण पूरक गणेश मुर्ती बनविणे, यापेक्षा पर्यावरण पूरक ग्राहक मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्राहक पर्यावरण पूरक विचारसरणीचा असेल तरच शिल्पकार पर्यावरणपूरक शिल्प साकारू शकतो.केवळ विचार करुण चालणार नाही,तर मूर्तीला योग्य मोबदला देऊन ग्राहक खरेदी करणारा असला पाहिजे.असे मत शिल्पकार अविनाश धडे,श्रुती धडे यांनी व्यक्त केले.

About The Author