गुरु-शिष्य परंपरा या विषयावर कार्यक्रम संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : गुरु-शिष्य परंपरा या विषयावर ऑनलाईन कार्यक्रम संपन्न झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ लातूर विभागाच्या वती ने 5 सप्टेंबर 2021 रोजी शिक्षक दिनानिमित्त गुरु-शिष्य परंपरा या विषयावर ऑनलाइन कार्यक्रम सम्पन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.सुंदर लोंढे (पुणे) हे होते. तर हिंदी अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी ऑनलाईन अध्यापन करत असताना शिक्षकांची भूमिका काय यावर आत्माभिमुख करणार्या बाबीवर मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर , शिक्षा शास्त्र महाविद्यालय पुणे यांनी आजच्या काळात शिक्षक सदवर्तनी, विद्वत्तापूर्ण, अध्यापन कुशल आणि विद्यार्थीप्रिय असावे, तर विद्यार्थी काकदृष्टी, श्वान निद्रा असणारा, अध्ययनाप्रति एकाग्र, चौकस, परिश्रमी आणि अल्प आहार घेणारा असावा. गुरु-शिष्य परंपरा यांची उच्चकोटिता परस्परावलंबुन असते यावर सविस्तर वक्तव्य केले. कार्यक्रमामध्ये गुरु-शिष्य परंपरा विषयावर कु. सई शिंदे , दयानंद महाविद्यालय लातूर , रोहित जाधव , जवाहर जुनियर कॉलेज अंदुर, उस्मानाबाद आणि कु. शेख सानिया मोहम्मद उच्च माध्यमिक उर्दू विद्यालय कुंडलवाडी, जिल्हा नांदेड यांनी आपल्या कविता सादर केल्या. प्रा. विजय गवळी, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर आणि प्रा. क्षमा करजगांवकर नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय नांदेड यांनी काव्यवाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर विभागाध्यक्ष प्रा.विश्वनाथ मरतुले यांनी केले. प्रा. किरण दंडीमे लातूर यांनी मंच संचालन केले व वक्ता परिचय प्रा.डॉ.आम्रपाली कसबे नांदेड यांनी दिले. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे सचिव प्रा. रेवणनाथ कर्डिले, अन्य विभागाचे विभागाध्यक्ष, सर्व जिलाध्यक्ष, पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.