शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या कडून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकाची पाहणी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यात दिनांक 5,6 7 सप्टेंबर रोजी पाऊस जास्त झाल्याने पिकात पाणी साचून शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे.अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नगदी तोंडावर काढणीला आलेले सोयाबीन,कापूस ही पीक पिकात पाणी साचल्याने वाया गेले आहेत.याची पाहणी करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी तालुक्यातील शिंदगी, मांगदरी, मोघा, हाडोळती येथे जाऊन शेतातील साचलेल्या पाण्यात जाऊन पाहणी केली.शेतकरी बांधवांनी जिल्हाप्रमुख रेड्डी यांच्या समोर हंबरडा फोडून रडत पिकाचे नुकसान झाले असून,आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असे शेतकरी बांधव सांगत होते, इतके प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नका शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या कडे पिकाची नुकसान बाबत माहिती देण्यात येईल, तुमचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी हा विषय मांडला जाईल आणि न्याय मिळवून देऊ शेतकरी बांधवांनी खचून न जाता ओल्या दुष्काळाचे संकट परतवून लावण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीर पने उभा राहून अतिवृष्टीने गेलेल्या पिकाचा मोबदला मिळवून देऊ असे आश्वासन जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी पाहणी दरम्यान शेतकरी बांधवांना दिले.पिकाची पाहणी करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या सोबत तालुका प्रमुख विलास पाटील हांगर्गेकर,अहमदपूर शहर प्रमुख तथा बाजार समितीचे संचालक भारत भाऊ सांगवीकर,बाजार समितीचे संचालक माऊली देवकाते,कृषी सह्याक रघुनाथ नाईक,पीक विमा कंपनी तालुका प्रतिनिधी बारवाड, सरपंच माधव नावलागिरे, शिवसेना विभाग प्रमुख लक्षणं कदम, लक्ष्मण बोईनवाड, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम कदम वंदनीय बाळासाहेब ठाकरे मदत कक्षाचे तालुका प्रमुख बाळासाहेब पडिले, नामदेव पडिले, गोविंद देवकत्ते, बाबुराव हारगीले, ज्ञानोबा मुळे, संजय कदम, धोंडीबा देवकाते, संभाजी बंडे, वैजनाथ जाभाडे, भागवत पडिले, प्रल्हाद कदम, गोविंद थावरे, दीपक मुळे, राम गुंडरे,धनाजी मुळे,ओम गुंडरे, महादेव स्वामी, बळीराम मुळे ,उमाकांत बुद्रुकवाड, बाळु भारकड, संगम मुळे, संतोष कदम, सुभाष गुंडीले सह शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख रेड्डी यांनी पिकात गुढग्याभर साचलेल्या पाण्यात जाऊन पाहणी केली. व कृषी अधिकारी, पीक विमा कंपनी चे अधिकारी याना सूचना करून तत्काळ पिकाचे नुकसान झालेले पंचनामे करण्याचे आवाहन केले.शेतकरी बांधवांनी कुठली अडचण आल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले.