अहमदपूरात पाऊस; शहरात अनेक भागात नालीचे पाणी घरात घुसले

अहमदपूरात पाऊस; शहरात अनेक भागात नालीचे पाणी घरात घुसले

नागरिकांचे हाल नगरपालिका कार्यालयाचे दुर्लक्ष
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरात सोमवारी रात्री पासुन मंगळवार दुपारपर्यंत पाऊस पडल्याने शहरातील नांदेड रोडवरील कराड नगर भागातील आसेफ शेख यांच्या घरात नालीचे पाणी घुसल्याने घरात घुडगा भर पाणी साचले आहे. त्यांच्या घरातील पलंग, कपडे अन्नधान्यसंसार उपयोगी वस्तुचें नुकसान झाले आहे. या भागात अनेकांच्या घरात नालीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. या नाल्यांची मागील दोन, तीन महिन्यांपासून साफसफाई करण्यात आलेली नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. नगरपालिकेस वारंवार कळवून साफसफाई करण्यात न आल्याने पाणी घरात गेल्याचे नागरिकांनी सांगितले.नगरपालिकेच्या दुर्लक्षाचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. शहरात सोमवार रात्रीपासुन संतधार पाऊस पडत असल्याने शहरातील ग्रामीण रुग्णालयात अराफत कॉलनी, या भागातही घरात नालीचे पाणी घुसले आहे. तसेच शॉपिग कॉम्पलेक्स येथे खासगी रुग्णालय आहेत. भागात रस्त्यावर गुडघाभर नालीचे पाणी साचल्याने दवाखान्यात जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे.शहरात झालेल्या पावसाने नालीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. येथील नाल्यांची साफसफाई दोनतीन महिन्यांपासून करण्यात आलेली नाही. वारंवार कल्पना देऊनही नगरपालिका कार्यालयाने दुर्लक्ष केले. याचे परिणाम मात्र सामान्य नागरिकांना भोगावे लागत आहे. मंगळवारी दुपारपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. शहरातील अनेक भागातील नाल्यांत कचरा जमा झाल्याने त्याचे पाणी जागेवर साचून राहते. नगरपालिका कार्यालयाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

शहरात अनेकांच्या घरांसमोर साचले पाणी
शहरात घरांच्या सभोवताली पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर निघण्यास अडचण होत आहे. सोमवार रात्रीपासून पाऊस पडत आहे म्हणून परिसरातील नाले भरले आहे. रस्त्यालगत अनेकांचे घर आहेत. तिथे नगरपालिकेने रस्ते व नाल्याची योग्य विल्हेवाट लावली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी अनेकांच्या घराच्या सभोवताली पसरले आहे. नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत रस्त्यावर निघावे लागते आहे. पाणी निचराअभावी संकट ओढावले आहे. नागरिक नगरपालिकेला घरटॅक्स, दिवाबत्ती, पाणीपट्टी कर देतात पण जमा झालेल्या रक्कमेचा योग्य विल्हेवाट लावले जाते की नाही याचा विचार करण्याची गरज आहे तरी नागरिकांच्या मुलभूत सोयीकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे. शहरातील कराड नगर भागातील नालीवर काही दुकानदारांनी अतिक्रमण केले असल्याने या भागातील नालीचे साफसफाई करता येत नाही. संबधित दुकानदारांनी नालीवरचे अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या भागात नालीचा कचारा काढण्यात येत आहे. त्र्यंबक कांबळे मुख्याधिकारी नगरपालिका अहमदपूर

About The Author