तुगावगाव येथे सर्वरोग निदान शिबीर संपन्

तुगावगाव येथे सर्वरोग निदान शिबीर संपन्

भालकी (प्रतिनिधी) : कै. उद्धवराव गाजरे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये उदयगिरी लायन्स हॉस्पिटलचे माननीय श्री. सचिन नीलंकर, राजेश तिवारी, रामानीता हॉस्पिटल लातूर चे डॉ. प्रियंका रोहित नवटके व मधुर डायबिटीज सुपर स्पेशालिटी सेंटरचे डॉ. प्रशांत नवटके (मधुमेह तज्ञ) उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तुगाव गावचे सरपंच निसार मुजावर तर सुरेश नेलवाडे, सतीश नेलवाडे, दिलीप पिनाटे ,बालाजी आडबळे, बाळासाहेब गाजरे, तातेराव गाजरे, लक्ष्मण गाजरे, दत्ता पाटील यांनी शिबिर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. गावामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये असून सुद्धा शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांचे स्वागत व आभार वृक्षारोपणासाठी आंब्याचे रोपटे देऊन करण्यात आले. यावेळी संधिवात, गुडघेदुखी वर डॉ.रोहित नवटके यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये सुमारे 278 लोकांची डोळ्याची, मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जाफर मुजावर, लक्ष्मण बगदुरे, पंढरी मुडबे, सतीश पिचरटे, शिवराज घोरवाडे, सुधाकर सूर्यवंशी व सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे नियोजन संतोष गाजरे यांनी तर प्रस्तावना अशोक पिनाटे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!