केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिस-कॉल आंदोलन

केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिस-कॉल आंदोलन

लातूर (प्रतिनिधी) : उसाच्या एफआरपी संदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करून या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मिस-कॉल आंदोलन केले जाणार आहे. नीती आयोगाने निर्णय घेतल्याचे सांगत केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या उसाला कोल्हापूर जिल्ह्यात १६८० तर इतर जिल्ह्यात १३२० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.एफआरपी मधील उर्वरित रक्कम पुढील हंगाम सुरु होईपर्यंत दोन टप्प्यात देण्यात येणार आहे.कारखाना बंद झाल्यानंतर २० टक्के व हंगाम सुरू होताना २० टक्के रक्कम दिली जाणार असल्याचे या निर्णयाद्वारे सांगण्यात आले आहे.राज्य सरकारनेही या निर्णयाला होकार दिलेला आहे.

सरकारने घेतलेला हा निर्णय तुघलकी असून सरकार व कारखानदारांचे हे षड्यंत्र आहे.ते हाणून पाडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे. या अंतर्गत रविवारी ( दि.१२ सप्टेंबर) ८४४८१८३७५१ या क्रमांकावर मिस कॉल देवून निषेध नोंदवला जाणार आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे.८४४८१८३७५१ या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे यांनी केले आहे.सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही मोरे यांनी दिला आहे.

About The Author