आलमला येथे उद्या मोफत सर्वरोग निदान शिबीर

औसा (प्रतिनिधी) : आलमला येथे १२ सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी ठीक ९ वाजता महादेव मंदिर, आलमला येथे  स्वर्गीय ऍड एस एस पाटील (बाबा), स्वर्गीय चंद्रकांत आप्पा कापसे (तात्या), स्वर्गीय चंद्रशेखर अण्णा हूरदळे (अण्णा) यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन हरिभक्त पारायण श्री गहिनीनाथ महाराज औसेकर विश्वस्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्या शुभहस्ते होणारआहे. या शिबिरासाठी लातूर येथील विविध नामांकित हॉस्पिटलचे तज्ञ मंडळी त्यात डॉ हनुमंत किनिकर (न्यूरो सर्जन सह्याद्री हॉस्पिटल, लातूर), डॉक्टर सुनीता पाटील (एमडी मेडिसन),  डॉ अरविंद भातांब्रे (साई क्रिटिकल हॉस्पिटल) डॉ पद्मसिंह पाटील (बाल रोग तज्ञ), डॉ दिग्विजय सिंह शिंदे (एमडी मेडिसिन), डॉ प्रदीप कुलकर्णी (दंत चिकित्सालय लातूर) यांच्याकडून आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा  जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आव्हान दिशा प्रतिष्ठान लातूर, गुरु सिद्ध मेडिकल लातूर, व ग्रामस्थ मंडळ आलमला यांच्या वतीने करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!